Photos of natural phenomena prove nature's magic
या ११ घटना सिद्ध करतात की, निसर्गापेक्षा मोठा जादुगार कुणीच नाही! By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 4:47 PM1 / 12जगभरात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या विश्वासही बसणार नाही इतक्या सुंदर आहेत. काही नैसर्गिक घटनाही अशात आहेत, ज्या सुंदर असण्यासोबतच शक्तीशालीही दिसतात. जणू आपण एखादा जादुचा नजारा बघत आहोत असं वाटतं. 2 / 121. Bioluminescent Waves - जर तुम्ही मालदीवमध्ये फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर वाधू द्वीपला नक्की भेट द्या. येथील बीचचा सुंदर पाहून तुम्हाला एक वेगळाच अनुभव मिळेल. असं वाटेल की, लाइट लावले आहेत. पण हा सगळा निसर्गाचा खेळ आहे. 3 / 122. Rainbow Eucalyptus Trees - आतापर्यंत आपण मोठ्यातलं मोठ्या झाडाचं खोड हे भुऱ्या रंगात पाहिलं आहे. पण Eucalyptus बाबत असं नाहीये. हे झाड इंद्रधनुष्याच्या रंगांनी रंगलं आहे. 4 / 123. White Rainbow - धुकं तयार झाल्यामुळे अनेकवेळा तुम्ही पांढरा इंद्रधनुष तयार झालेला बघू शकता. याला Fogbow असंही म्हटलं जातं. 5 / 124. Frost Flowers - यावर तुम्हाला विश्वास ठेवणं कठीण होईल की, हे फूल बर्फापासून तयार झालेले आहेत. हे फूल अगदी खऱ्या फुलांप्रमाणे दिसतात. पण हे फूल पाहण्यासाठी तुम्हाला Antarctica जावं लागेल. 6 / 125. Blue Volcano - Ethiopia मध्ये ज्वालामुखीतून निघणारा लाव्हारस निळ्या रंगाचा दिसतो. हा नजारा खरंच कल्पनेपलिकडचा आहे. 7 / 126. Great Blue Hole - समुद्र स्तरात वाढ झाल्याने Belize तटावर पाण्याखाली अशाप्रकारे Caves तयार झाल्या आहेत.8 / 127. Aurora Borealis - खासकरुन अशाप्रकारचा प्रकाश आर्कटिक आणि अंटार्टिकाजवळ बघायला मिळते. 9 / 128. Reflecting Desert - हा नजारा बोलीवियाच्या Salar De Uyuni मधील आहे. 10 / 129. Door to Hell - असे म्हटले जाते की, १९७१ मध्ये Turkmenistan च्या वाळवंटात काही पेट्रोलियम इंजिनिअर्सनी आग लावली होती. ही आग आजही पेटलेलीच आहे. 11 / 1210. Danxia landforms - चीनमधील हा सुंदर डोंगर हवा आणि पाण्यापासून तयार झाला आहे. निसर्गाची कमाल काय असते हे यातून बघायला मिळतं. 12 / 1211. Spotted Lake - ब्रिटिश कोलंबिया, कॅनडाच्या Osoyoos येथील हा तलाव गरमीच्या दिवसात रंगीत खनिज रिलीज करतो. आणखी वाचा Subscribe to Notifications