Pictures that reveal a lot about some of the secrets that our world holds
भन्नाट! जगाची अशी बाजू ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल, हे पाहून म्हणाल, अरे बाप रे बाप.... By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2020 3:34 PM1 / 16जगात खूप गोष्टी अशा आहेत ज्यांबाबत आपल्याला माहीत नाही. याच माहीत नसलेल्या दुनियेची सफर करवणारे काही फोटोज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हे फोटो पाहून तुम्ही विचारात पडाल की, खरंच असं असतं का? किंवा हे असं कसं?2 / 16हा फोटो पाहून असं वाटतं की, एकतर हा एखाद्या फरशीचा जवळून काढलेला फोटो असावा. पण हा फोटो कोणत्याही रस्त्याचा किंवा फरशीचा नाही तर नवी दिल्लीचा एरिअल व्ह्यू आहे.3 / 16हे ते ठिकाण आहे जिथे अॅमेझॉनची नदी आणि काळी नदी एकत्र येते. दोन वेगवेगळ्या रंगाच्या नद्या एकत्र आल्यावर असा नजारा दिसतो.4 / 16हे दुसरं तिसरं काही नसून Bookshelf आहे.5 / 16वेगवगेळ्या देशांच्या बॉर्डर कशा असतात हे तुम्ही सिनेमात पाहिलं असेलच. पण या फोटोत आहे तशी नक्कीच पाहिली नसेल. या फोटोत बेल्जिअम आणि नेदरलॅंड या देशांची बॉर्डर आहे.6 / 16तुम्ही ज्या मोठ्या बॉटलमधून पाणी पिता ती एक लिटरची बॉटल तयार होण्याआधी अशी दिसते.7 / 16पाण्यात पुल तयार करण्यासाठी आधी अशाप्रकारे खांबांची जागा तयार केली जाते. पाणी ज्याप्रकारे अडवलंय ते आश्चर्यकारक आहे.8 / 16या फोटोतील चिम्पांजीची शेविंग करण्यात आली आहे. हा फोटो पाहिल्यावर तर नक्कीच हे वाटतं की, मनुष्य आणि चिम्पांजी नातेवाईक आहेत.9 / 16काही सिनेमांमध्ये हिरो स्वत: कार ड्राइव्ह करत नाहीत. पण ते ड्रायव्हर सीटवर बसलेले असतात. यावेळी कार वर बसलेला ड्रायव्हर चालवत असतो.10 / 16जादुगारांच्या शोमध्ये एका व्यक्तीचे दोन तुकडे केल्याचं दाखवलं जातं. पण ती ट्रिक नेमकी कशी असते ते या फोटो बघायला मिळतं.11 / 16घरात सामान नाही तर थेट घरच शिफ्टींग करणं सुरू आहे. सामानासाठी वेगळी गाडी सांगायचं टेन्शनच नाही.12 / 16नामीबियातील या ठिकाणी समुद्र वाळवंटाला येऊन मिळतो. सामान्यपणे असं चित्र फारच कमी बघायला मिळतं. त्यामुळे हा नजारा अद्बुत आहे.13 / 16पहिल्या नजरेत असं वाटतं की, यात कम्प्युटरचा मदरबोर्ड आहे. पण हा मदरबोर्ड नसून हा फोटो न्यूयॉर्क शहराचा आहे. रात्री न्यूयॉर्क इतकं सुंदर दिसतं.14 / 16आपल्याकडे कधी तरी तुम्ही पाहिलं असेल की, फुटपाथ कसे एक एक वीट लावून तयार केले जातात. पण परदेशात फुटपाथ असे तयार केले जातात.15 / 16विजेचे मोठाले टॉवर ज्याला लोक गमतीने रावण म्हणतात ते असे उभारले जातात. भारतात तर लोक एक एक रॉड जोडताना दिसतात.16 / 16सूर्याच्या डावीकडे एक छोटासा काळा ठिपका दिसतोय. तुमचा विश्वास बसणार नाही, पण तो बुध ग्रह आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications