शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Prank पडला 'लय' भारी! तोंडावर मास्कच्या जागी रंग; मूर्ख बनविणे तरुणीला भोवले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 9:03 AM

1 / 10
कोरोना व्हायरसने (Corona Virus) रौद्ररुप धारण केले आहे. आता तर घरात एकमेकांना कोरोनाची लागण न होण्यासाठी मास्क घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र, अनेक असे महाभाग आहेत जे मास्क घातल्यास त्यांचे सौंदर्य खराब होईल, असा युक्तीवाद करत आहेत.
2 / 10
अशाच एका तरुणीला मास्क न घालणे आणि तपासणी यंत्रणांना मूर्ख बनविण्याचा प्रकार भारी पडला आहे. या तरुणीचा पासपोर्टच जप्त करण्यात आला आहे.
3 / 10
इंडोनेशियामधील हा प्रकार आहे. भारतासारखेच तिथेही फेस मास्क घालणे बंधनकारक आहे. बालीमध्ये एका जोडप्याला ताब्यात घेण्यात आले. या तरुणीने मास्कच्या जागी हुबेहुब रंगविले होते. तिने त्यांच्या चेहऱ्यावर रंगाने मास्क आखला होता.
4 / 10
या दोघांपैकी एकीने हा प्रकार केला होता. तिने दुकानदाराला मूर्ख बनविण्यासाठी तिच्या चेहऱ्यावर सर्जिकल मास्कच्या रंगाची पेंटिंग काढली होती. हा आकाशी निळा रंग होता.
5 / 10
या तरुणीचे नाव लिया असे आहे. तर तिच्यासोबत असलेल्या तरुणाचे नाव जोश पालर लिन आहे. ते सुपरमार्केटमध्ये भटकत असताना व्हिडीओ काढला.
6 / 10
लियाने सुपरमार्केटमध्ये प्रवेश करताना दुकानदाराला हातोहात फसविले. तिने तोंड आणि नाकावर निळ्या रंगाने रंगविले होते. तसेच मास्क कानाला अडकविला आहे हे भासविण्यासाठी पांढऱ्या रंगाची लाईनदेखील ओढली होती.
7 / 10
खरेतर तिने हे व्हिडीओ बनवून युट्यूब, फेसबुकसारख्या सोशल मीडियावर खूप सारे व्ह्यूज मिळविण्यासाठी केले होते.
8 / 10
मात्र, या दोघांची क्लुप्ती कामी आली नाही. त्यांचा व्हिडीओ व्हायरल तर झाला पण त्यांना लोकांनी चांगलेच सुनावले. लोकांनी त्यांना बेजबाबदार आणि दुसऱ्यांच्या जिवाला धोका उत्पन्न करणारे म्हटले आहे.
9 / 10
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर इंडोनेशिया प्रशासनाने देखील दोघांवरही कारवाई केली आणि पासपोर्ट जप्त केला.
10 / 10
लिया ही रशियन नागरिक आहे. जर जोश हा तैवानचा आहे. पासपोर्ट जप्त झाल्याने आता त्यांची रवानगी मायदेशी करण्याची शक्यता आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndonesiaइंडोनेशियाrussiaरशिया