Republic day-2020 pandharpur vitthal mandir decorated by tricolour flowers
प्रजासत्ताक दिन २०२०: विठ्ठलाच्या गाभाऱ्याचे सौंदर्य फुलले तिरंग्याच्या रंगांनी By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2020 11:15 AM1 / 6राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र असणाऱ्या पंढरपुरमधील श्री विठ्ठल मंदिरातही प्रजासत्ताक दिनाचा उत्साह दिसून येत आहे. श्री विठ्ठल मंदिरात देवाचा गाभारा ,चौखांबी, सोळखंभी मंडप,तीन रंगाच्या फुलांनी न्हाऊन निघाला आहे.2 / 6झेंडू,पांढरी चमेली तर हिरवी तुळशी अश्या तीन रंगाच्या छटांनी मंदिर फुलून गेलं आहे.3 / 6नेहमीच वेगवेगळ्या प्रसंगाचे औचित्य साधून विठ्ठलाचा गाभारा सजवला जातो. पण नेहमीपेक्षा आज विठ्ठलाच्या गाभारा आणि सजावट यांचे सौदर्य पाहण्यासारखे आहे. 4 / 6विठुराया आणि रुक्मिणी आईला शॉल, उपरणे अशी उबदार वस्त्रे परिधान करण्यात आली आहेत.5 / 6यावेळी विशेष म्हणजे तिरंगी उपरण्यामुळे देवाचे रूप अधिक खुलून दिसत आहे. भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे.6 / 6आजचा देवाचा साज आणि सौंदर्य पाहून मन शांत होते. अत्यंत प्रभावीपणे प्रजासत्ताक दिनाच्या थीमचा वापर करून गाभारा सजवला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications