शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

चेहरा कोरडा, डोळ्यात अश्रू...; पहिल्या शोवर समय रैनाची अवस्था, तरीही म्हणाला, "याद रखना दोस्तों..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 21:02 IST

1 / 7
एडमंटन, कॅनडात स्टँडअप शो दरम्यान, समय रैनाने त्याच्यासोबत घडलेल्या प्रकरणावर भाष्य केलं आहे. शोमध्ये पोहोचलेल्या एका चाहत्याने त्याच्या फेसबुक पोस्टमध्ये याबद्दल सांगितले आहे.
2 / 7
कॅनडातील एडमंटन येथील मायर होरोविट्झ थिएटरमध्ये झालेल्या लाईव्ह शोमध्ये समय रैनाने नुकताच रणवीर अलाहाबादियाच्या वादाबद्दल भाष्य केले. या शोमध्ये सहभागी झालेल्या शुभम दत्ता या चाहत्याने फेसबुकवर आपला अनुभव शेअर केला. द शो मस्ट गो ऑन… असं लिहीत या पोस्टमध्ये त्याने स्टेजवर समय रैनाच्या भावनिक अवस्थेबाबत भाष्य केलं.
3 / 7
शुभम दत्ताच्या म्हणण्यानुसार, समय रैना थकलेला दिसत होता. तणावामुळे त्याचे बोलणे मंदावलेले होते. स्टेजवर पाऊल ठेवताच त्याच्या चेहऱ्यावरून अश्रू ओघळत होते. असं असूनही, त्याने एक दीर्घ श्वास घेतला, स्वतःला सावरले आणि प्रेक्षकांनी त्याच्या नावाची घोषणा देण्यास सुरुवात केली.
4 / 7
“काही तासांपूर्वी मी या माणसाच्या लाईव्ह शोमध्ये उपस्थित होतो तेव्हा मला अखेर या वाक्यांशाचा खरा अर्थ समजला! पहिल्यांदाच, मी आजच्या पिढीतील जवळजवळ सातशे तथाकथित बिघडलेल्या लोकांना त्याच्या नावाचा जयजयकार करताना पाहिले. त्यांच्या मध्यभागी एक स्टँड-अप कॉमेडियन उभा होता, सेट सुरू होण्यापूर्वी त्याच्या चेहऱ्यावरून अश्रू वाहत होते,” असं दत्ता याने पोस्टमध्ये म्हटलं.
5 / 7
शो दरम्यान, एका प्रेक्षकाने समय रैनाबद्दल विनोद केला. त्याने रणवीर अलाहाबादिया आणि त्याच्या वादाचा उल्लेख केला. जेव्हा गर्दीतील एका व्यक्तीने विनोदी टिका केली तेव्हा रैनाने त्याच्या नेहमीच्या शैलीत जोरदार प्रत्युत्तर दिले.
6 / 7
यावर समयने, इस शो पर बहुत मौके आएंगे, जहां आपको लग सकता है कि मैं बहुत मजेदार कुछ बोल सकता हूं, पर तब बीयरबिसेप्स को याद कर लेना भाई, असं म्हटलं.
7 / 7
शो संतपात समयने त्याच्यासोबत घडलेल्या घटनेबद्दल सांगितले. कठीण काळातही त्याने प्रेक्षकांना दोन तास हसवले. त्यानंतर समयने 'शायद समय ख़राब चल रहा है मेरा, पर याद रखना दोस्तों, मैं समय हूँ,' असं म्हणत शोचा शेवट केला.
टॅग्स :Ranveer Allahbadiaरणवीर अलाहाबादियाSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल