Sara Tendulkar Joins Sachin Tendulkar Foundation As Director Confirms By Legendary Batter See Pics
साराचा नवा प्रवास! गोरगरिब लेकरांसाठी काम करत तेंडुलकर घराण्याची परंपरा जपण्याचा 'ध्यास' By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2024 1:38 PM1 / 8क्रिकेट जगतात अधिराज्य गाजवणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर समाज सेवेतही आघाडीवर आहे. बऱ्याच दिवसांपासून तो 'सचिन तेंडुलकर फाउंडेशन'च्या माध्यमातून गरीब मुलांसाठी काम करत आहे.2 / 8गरजू आणि गरीब मुलांना शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात सशक्त करण्यासाठी सचिन तेंडुलकरची ही संस्था काम करते. 3 / 8या संस्थेत आता सचिनची लाडली लेक सारा तेंडुलकर मोठी जबाबदारी पार पाडताना दिसणार आहे.4 / 8परदेशातील उच्च शिक्षण घेतल्यानंतर सारा तेंडुलकर काय करणार? हा प्रश्न अनेकदा चर्चेत असायचा. त्याच उत्तर आता मिळालं आहे. सारा तेंडुलकर व्यवस्थापकाच्या रुपात वडीलांच्या संस्थेत जॉईन झाली आहे. याचा अर्थ ती आता गोरगरिब लेकरांचा सहारा झालीये. 5 / 8मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती शेअर केलीये. 6 / 8सारा तेंडुलकर हिने आपली मास्टर डिग्री या संस्थेच्या कामाशी संबंधित विषयातच पूर्ण केली असून ती आता सशक्त भारत मोहिमेत सहभागी होत नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे, याचा आनंद वाटतो, अशी भावना सचिनने व्यक्त केली आहे.7 / 8सारानं यूनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथून क्लिनिकल अँड पब्लिक हेल्थ न्यूट्रिशन मास्टर डिग्रीचं शिक्षण घेतलं आहे, असा उल्लेखही सचिन तेंडुलकर याने आपल्या पोस्टमध्ये केला आहे.8 / 8सारा तेंडुलकर याआधीही या संस्थेत आई बाबांसोबत मिळून काम करताना पाहायला मिळाले होते. आता ती अधिकृतरित्या थेट डायरेक्टरच्या रुपात संस्थेशी कनेक्ट झालीये. आणखी वाचा Subscribe to Notifications