शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ग्रेनेड हल्ल्यात 'तिने' गमावले स्वत:चे दोन्ही हात; पण आज देतेय सगळ्यांनाच प्रेरणा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 8:10 PM

1 / 5
मालविका अय्यर… ती अवघ्या 13 वर्षाची होती. ग्रेनेडचा स्फोटात तिने दोन्ही हात गमावले आहेत, आज ती 30 वर्षांची आहे. पण तिची कहाणी सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे. 18 फेब्रुवारीला ती 30 वर्षांची झाली. वास्तविक, तिची एक ट्विटर पोस्ट व्हायरल झाली. वाढदिवशी तिने ही पोस्ट लिहिली होती. तेव्हापासून लोक तिची कथा जाणून घेण्यास उत्सुक आहेत.
2 / 5
मलाविकाने त्यात लिहिलं आहे की, 'वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, बॉम्बने माझे हात गेले तेव्हा डॉक्टरांनी माझा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी माझ्या उजव्या हाताच्या मागच्या भागात काही शस्त्रक्रिया चुकीच्या केल्या. त्यामुळे तिच्या हातातल्या मांसाने टोकदार हाडाला झाकलं गेलं. मात्र ती चूक माझ्यासाठी फायदेशीर ठरली, त्यामुळे मला टाईपिंग करण्याची अडचण दूर झाली.
3 / 5
जेव्हा मालविका अय्यर 13 वर्षांची होती, तेव्हा 2002 मध्ये ग्रेनेडचा स्फोट झाला तेव्हा तिने दोन्ही हात गमावला. त्यावेळी ती राजस्थानमध्ये बीकानेर येथे आपल्या कुटुंबासह राहत होती. तथापि, या घटनेत तिचा मृत्यूही झाला असता, परिस्थिती अत्यंत नाजूक होती. मात्र यानंतर तिचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला
4 / 5
या अपघातानंतर तिने लोकांची मदत करण्याचा निर्णय घेतला. अपघातातून सावरण्यास बराच काळ लागला. ती एक सामाजिक कार्यकर्ता झाली. ती सध्या आंतरराष्ट्रीय मोटिवेशनल स्पीकर म्हणून काम करते आणि अपंगत्व कार्यकर्ता आहे.
5 / 5
मालविका यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नारी शक्ती पुरस्कार २०१७ ने सन्मानित करण्यात आलंय. रुग्णालयात भरती असल्यामुळे तिला 2002-03 मध्ये 9 वी परीक्षेस बसता आलं नाही, कारकुनाच्या मदतीने तिने कागदपत्रे दिली. शिवाय राज्यातील टॉपर्सच्या यादीत तिचा समावेश होता. पुढील अभ्यास तिने दिल्लीच्या सेंट स्टीफन कॉलेजमध्ये केला. अर्थशास्त्र विषयात तिने पदवी घेतली आहे. दिल्ली येथून सोशल वर्कमध्ये मास्टर्स. त्यानंतर मद्रास स्कूल ऑफ सोशल वर्क, चेन्नईमधून सोशल वर्कमध्ये एमफिल आणि पीएचडी केली आहे.
टॅग्स :Bombsस्फोटके