शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ह्दयद्रावक! २६ वर्षीय दिव्यांग मुलाला पाठीवर घेऊन आई करतेय जगभ्रमंती, कारण..

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 5:24 PM

1 / 9
जगात असे अनेक दिव्यांग आहेत जे कुणावर तरी अवलंबून असतात. मात्र जे लोक दिव्यांगांची मदत करतात ते सगळ्यांसाठी प्रेरणादायी ठरतात. त्यात आई म्हटलं तरी आपल्या मुलासाठी काहीही करण्यास तयार असते. ती नेहमी मुलाची काळजी घेते. स्वामी तिन्ही जगाचा पण आईविना भिकारी असं म्हटलं जातं. अशाच एका आई-मुलाच्या नात्याबाबत तुम्हाला सांगत आहोत. जे ऐकून तुमचेही डोळे पाण्यानं भरुन येतील.
2 / 9
ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे राहणाऱ्या २६ वर्षीय जिमी अंतरम(Jimmy Antram) याला लहानपणापासून बघता येत नाही. परंतु त्याची आई त्याला स्वत:च्या पाठीवर बसवून सर्व जग दाखवत आहे. जिमीची आई निकी अंतरम जेव्हा १७ वर्षाची होती तेव्हा ती आई बनली होती.
3 / 9
निकीला जेव्हा ही गोष्ट कळाली ती तिचा मुलगा अंध आहे. त्याला काहीही दिसत नाही तेव्हा निकीनं स्वत: मुलाचे डोळे बनून त्याला हे जग दाखवायचं हे ठरवलं. सध्या निकी आणि जिमी दोघंही वर्ल्ड टूरवर असून निकी आईच्या डोळ्यांनी हे जग पाहतोय.
4 / 9
निकीचं वय आता ४३ वर्ष आहे. या वयातही ती २६ वर्षीय मुलाला पाठीवर घेऊन चालते. परंतु वाढत्या वयामुळे निकीसाठी हे खूप आव्हानात्मक बनलं आहे. परंतु आजही निकीनं जे स्वत:च्या मनाशी ठरवलं होतं जिमीला हे सर्व जग दाखवायचं तेच आई म्हणून ती पूर्ण करत आहे.
5 / 9
निकी आणि जिमी आतापर्यंत जगातील बहुतांश देश फिरुन आले आहेत. ते ऑस्ट्रेलियाशिवाय Hawaii आणि बाली हेदेखील पाहायला गेले आहेत. इतकचं नाही तर लवकरच ते आगामी काही दिवसांत कॅनडाला जाण्याची प्लॅनिंग करत आहेत.
6 / 9
निकी सांगते की, अंध असल्यासोबतच त्यांचा मुलगी जिमी शारिरीक अडचणींचा सामना करतोय. २४ तास जिमीची देखभाल करण्याची गरज भासते. जिमीला त्याच्या आईसोबत राहण्यास खूप आवडतं. जिमीकडे व्हिलचेअर आहे परंतु निकी त्याला व्हिलचेअरवरुन घेऊन जाणं पसंत करत नाही.
7 / 9
निकी जिमीला स्वत:च्या पाठीवर घेऊन जाते. आता हळूहळू अनेक लोकं जिमीला ओळखू लागली आहेत. त्यांचे एक इन्स्टा पेज आहे. ज्यात निकी फोटो पोस्ट करत असते. लोकं त्यांना खूप प्रेम देतात. जिमी केवळ २ महिन्याचा असताना त्याला दिसणार नाही हे आईला कळालं.
8 / 9
जिमीच्या आजीनं जेव्हा पाहिलं की तो खेळण्यांपर्यंत पोहचू शकत नाही. तेव्हा त्याला डॉक्टरांकडे नेण्यात आले. तेव्हा जिमीला कधी पाहता येणार नाही असं त्यांनी सांगितले. जिमीची काळजी घेण्यासाठी आई निकी स्वत: फीट राहते. तिला स्विमिंग आणि वर्कआऊट करणं खूप आवडतं.
9 / 9
निकी जिमीसोबत फोटो शेअर करत असते. फिटनेसबाबतही निकी जागरुक आहे. तिला हँडस्टॅंड आणि डीप सी डाइव करणंही आवडतं. जिमीवर गेल्या अनेक वर्षांपासून उपचार सुरु आहेत. जिमी हाच माझ्यासाठी सर्वकाही आहे. भलेही तो हे जग त्याच्या डोळ्यांनी पाहू शकत नसेल मात्र त्याचं मन हे सगळं सुंदर जग पाहतंय.