son tweet about photo of sad dad new donut shop has no customers gets sweet reaction on twitter
वडिलांचं रिकामं दुकान पाहून मुलानं केलं हे काम, काही मिनिटांतच लागली रांग By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 3:05 PM1 / 6सोशल मीडिया हे आता प्रभावी माध्यम झालं आहे. सोशल मीडियावर क्षणार्धात एखादी गोष्ट व्हायरल होते. ट्विटर किंवा फेसबुकसारख्या माध्यमांवरून अनेकदा एखाद्याला ट्रोलिंगही केलं जातं. बिलीनं वडिलांचं रिकामे दुकान पाहून ट्विटर एक फोटो शेअर केला. तो वाऱ्यासारखा व्हायरल झाला. 2 / 6एका दुकानाचा फोटो शेअर करत बिलीनं लिहिलं की, माझे वडील दुःखी आहेत. कारण त्यांच्या डोनट दुकानात कोणीही येत नाही. 3 / 6या मजकुराबरोबरच बिलीनं डोनट्स अन् वडील उभे असलेल्या रिकाम्या दुकानाचा फोटो ट्विटरवर शेअर केला. बिलीची ही भावुक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून, तीन लाखांहून अधिक लोकांनी ती रिट्विट केली आहे. 4 / 6तर सात लाखांहून अधिक लोकांना ती आवडली आहे. यू ट्युब स्टार Casey Neistatनेसुद्धा बिलीची ही पोस्ट रिट्विट केली आहे. तसेच ट्विटरच्या ऑफिशियल हँडलवरून बिलीच्या पोस्टला रिप्लाय देण्यात आला आहे. 5 / 6ट्विटरच्या टीमनं बिलीच्या दुकानाला भेट दिली असून, बिलीच्या दुकानाच्या बाहेर आता रांगाच्या रांगा लागल्या आहेत. 6 / 6 बिलीनं त्यानंतर एक पोस्टही शेअर केली आहे, ज्यात त्यानं दुकानातील सर्व डोनट्स विकले गेल्याचं सांगितलं आहे. तसेच त्यांनी दुकानांत येणाऱ्या ग्राहकांचेही ट्विटरवरून आभार मानले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications