शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कोणी डान्सने तर कोणी सुंदरतेने जिंकली मनं; 2022 मध्ये या 5 मुलींनी वाढवला इंटरनेटचा पारा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 4:40 PM

1 / 6
हे सोशल मीडियाचे युग आहे, इथे कोण कधी प्रसिद्धीच्या झोतात येईल याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही. सोशल मीडियामुळे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचलेली मंडळी मोठ्या प्रमाणात आहे. या वर्षी सोशल मीडियावर अनेक लोक चर्चेत होते जे रातोरात सर्वांच्या घरात पोहचले. अनेक मुलीही त्यांच्या व्हिडीओंमुळे चर्चेत राहिल्या. अशाच काही मुलींनी सोशल मीडियाच्या जोरावर प्रसिद्धी मिळवली आहे.
2 / 6
या वर्षाच्या सुरुवातीला भुवन बड्याकर नावाचा माणूस सोशल मीडियावर 'कच्चा बदाम' हे गाणे गाऊन स्टार झाला. शेंगदाणे विकताना त्याने मजेशीरपणे गुणगुणलेले गाणे त्याची ओळख बनली. या गाण्यावर अनेकांनी डान्स करून प्रसिद्धी मिळवली. यातीलच एक नाव म्हणजे अंजली अरोरा. ती 'कच्चा बदाम गर्ल' या नावाने प्रसिद्ध झाली होती. अंजलीने या गाण्यावर बोल्ड मूव्ह्ससह ग्लॅमरस स्टाईलमध्ये डान्स करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
3 / 6
इंस्टाग्राम युजर ईशानी डान्सर आणि डेंटिस्ट आहे. खरं तर ती 'देसी शफल' नावाच्या डान्स ग्रुपची सदस्य देखील आहे. या वर्षी जूनमध्ये तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला ज्यामध्ये ती तिच्या सहकाऱ्यांसह अमेरिकेच्या टाइम्स स्क्वेअरवर नाचताना पाहायला मिळाली. या चार मुलींनी ऐश्वर्या राय बच्चनच्या 'बरसो रे मेघा' या गाण्यावर डान्स केला. हा व्हिडीओ इतका लोकप्रिय झाला की तो केवळ इंस्टाग्रामवरच नाही तर इतर सोशल मीडियावरील अनेक प्लॅटफॉर्मवर देखील व्हायरल झाला होता.
4 / 6
याच वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात एका गोंडस चिमुरडीने तिच्या भावासोबत एक मजेदार व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवली. झारा आणि जोहान अशी या दोघांची नावे असून ती मुले पाकिस्तानमधील कराची येथील आहेत. हा क्यूट व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेचा विषय बनला होता.
5 / 6
काही दिवसांपूर्वी इंग्लंडच्या संघाने टी-20 विश्वचषकाचा किताब जिंकला. त्यापूर्वी पाकिस्तानच्या संघाने उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडच्या संघाचा पराभव केला. मात्र हा सामना एका मिस्ट्री गर्लमुळे फारच चर्चेत राहिला. ही तरूणी पाकिस्तानातील असून आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी तिने मैदानात हजेरी लावली होती. तिचे नाव नताशा असल्याचे बोलले जात आहे. सामन्यादरम्यान ही मुलगी पाकिस्तानी संघाला चिअर करताना दिसली. नंतर तिने खेळाडूंच्या दिशेने फ्लाइंग किसही दिले. यानंतर सोशल मीडियावर तिचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागले.
6 / 6
सध्या सोशल मीडियावर पाकिस्तानी तरूणीच्या डान्सचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. 'मेरा दिल ये पुकारे आ जा' या लता मंगेशकर यांच्या गाण्यावर ती डान्स करताना पाहायला मिळत आहे. माहितीनुसार, या मुलीचे नाव आयशा असून ती पाकिस्तानच्या लाहोरमध्ये राहते.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाViral Photosव्हायरल फोटोज्