शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

झाडापासून ते शॉपिंग मॉलपर्यंत, बघा जगातल्या १० सर्वात मोठ्या गोष्टी!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 3:22 PM

1 / 11
पृथ्वी फार सुंदर आणि शानदार ग्रह आहे. पृथ्वी अनेक अद्भूत गोष्टींचं घर आहे. इथे छोट्या छोट्या जीवांपासून ते मोठ मोठ्या डोंगरांपर्यंत सगळ्याच गोष्टी आहेत. आज आम्ही तुम्हाला पृथ्वीवरील सर्वात मोठ्या काही गोष्टींची माहिती सांगणार आहोत, ज्यांच्याबाबत तुम्ही क्वचितच ऐकलं असेल.
2 / 11
१) सर्वात मोठं झाड - Sequoia Trees हे जगातलं सर्वात उंच आणि सर्वात जास्त वर्ष जगणारं झाड आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये असलेल्या या प्रजातीचे झाड ३५०० वर्षांपर्यंत जिवंत राहू शकतात. या प्रजातीच्या Hyperion नावाच्या झाडाची उंची साधारण ३९७.७ फूट आहे.
3 / 11
२) सर्वात मोठा Salt Flat - दक्षिण बोलिवियामध्ये असलेलं Salar De Uyuni हा भाग जगातला मोठा Salt Flat आहे. पांढऱ्या मिठाच्या डोंगरांनी बनलेला मिठाचा हा वाळवंट साधारण ११०० स्क्वायर किलोमीटरमध्ये पसरला आहे.
4 / 11
३) सर्वात मोठी गुहा - जगातली सर्वात मोठी गुहा व्हिएतमानमध्ये आहे. या गुहेचं नाव Son Doong Cave आहे. ही गुहा ९ किलोमीटर लांब, २०० मीटर रूंद आणि १५० मीटर उंच आहे.
5 / 11
४) सर्वात मोठा मॉल - जगातला सर्वात मोठा मॉल हा दुबई मॉल आहे. हा शॉपिंग मॉल ७.५ लाख वर्ग मीटर क्षेत्रफळात तयार करण्यात आला आहे. इथे साधारण १२०० दुकाने आहेत. तसेच यात थीम पार्क, थिएटर, हॉटेल, रेस्टॉरंट आणि अंडरवॉटर झू सुद्धा आहे.
6 / 11
५) जमिनीवरील सर्वात मोठा जीव - हत्ती हा जमिनीवरील सर्वात मोठा जीव आहे. सर्वात हुशार जनावरांपैकी एक असलेल्या हत्तीचं वजन साधारण ७००० किलो ग्रॅम आणि १३ फूट लांब असू शकतात.
7 / 11
६) सर्वात मोठं फळ - फसण हे जगातलं सर्वात मोठं फळ मानलं जातं. वेगवेगळे पोषक तत्त्व असलेलं हे फळ ३५ किलोग्रॅम वजनाचं आणि ९० सेंटीमीटर लांब असू शकतं.
8 / 11
७) पाण्यात राहणारा सर्वात मोठा जीव - ब्लू व्हेल मासा हा पाण्यात राहणारा सर्वात मोठा जीव आहे. यांचं वजन १८० टन तर लांबी साधारण ३० मीटर असू शकते. हे अटलांटिक, प्रशांत आणि हिंद महासागरात आढळतात.
9 / 11
८) सर्वात मोठं स्वीमिंग पूल - चिलीच्या एका प्रायव्हेट सिसॉर्टमध्ये San Alfonso Del Mar स्वीमिंग पूल जगातील सर्वात मोठं स्वीमिंग पूल आहे. हा स्वीमिंग पूल १९.७७ एकर परिसरात तयार करण्यात आला आहे. तर यात २५० मिलियन लिटर पाणी बसतं.
10 / 11
८) सर्वात मोठं स्वीमिंग पूल - चिलीच्या एका प्रायव्हेट सिसॉर्टमध्ये San Alfonso Del Mar स्वीमिंग पूल जगातील सर्वात मोठं स्वीमिंग पूल आहे. हा स्वीमिंग पूल १९.७७ एकर परिसरात तयार करण्यात आला आहे. तर यात २५० मिलियन लिटर पाणी बसतं.
11 / 11
१०) सर्वात मोठा धबधबा - नायगरा फॉल्स हा जगातला सर्वात मोठा धबधबा आहे. अमेरिका आणि कॅनडा सीमेवर असलेल्या या धबधब्यावर ३ धबधब्यांचा संगम आहे.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल