शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

थायलँडच्या राजाच्या प्रेयसीचे शेकडो न्यूड फोटो लीक; अनेक दिवसांपासून राणीशी सुरू होतं भांडण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2020 17:09 IST

1 / 5
थायलँडचा राजा मह वदिरालोंहकोर्न याची प्रेयसी सीनीत वोंगविदरापकडीचे शेकडो फोटोज लिक करण्यात आले आहेत. thetimes.co.uk च्या रिपोर्ट्नुसार यातील अनेक फोटोज हे न्यूड आहेत. असं मानलं जात आहे की, राजाची पत्नी सुथिडा आणि गर्लफ्रेंड सीनीत यांच्यात भांडणं झाल्यामुळे हे फोटोज लीक झाले आहेत. सुथिडा ही थायलँडची रानी आहे.
2 / 5
थायलंडच्या राजाची प्रेयसी सीनीतचे फोटो अशा वेळी लिक झाले आहेत जेव्हा ती तुरूंगातून परत आली आणि राजाच्या जवळ आली. आश्चर्य म्हणजे राजीच्या प्रेयसीला गेल्या वर्षी तुरूंगात डांबण्यात आले होते. तिच्यावर राणीची प्रतिमा खराब करण्याचा आरोप होता.
3 / 5
डेलीमेलच्या रिपोर्टनुसार सीनीतचे न्यूड फोटोज थायलँडच्या राजेशाही विरुद्ध विरोध प्रदर्शन करत आहेत. हे फोटोज २०१२ ते २०१४ या काळात काढण्यात आले होते. असं समजलं जात आहे की, सीनीतने स्वतःहे फोटोज काढले होते.
4 / 5
थायलँडच्या राजेशाहीचे साक्षीदार असलेले ब्रिटश पत्रकार मँकग्रेगर मार्शल यांनाही सीनीतचे फोटो पाठवण्यात आले होते. थायलँडच्या ६८ व्या राजाने वदिरालोंगकोर्नने २०१९ मध्ये सुथिडाशी लग्न केलं होतं. त्यामुळे सुथिडाला राणीचा दर्जा मिळाला होता. याआधीही राजाने तीन लग्न केली होती. राजाची एकूण ७ मुलं आहेत. आता मागच्या तीन पत्नींसह घटस्फोट घेतला आहे.
5 / 5
४२ वर्षीय सुथिडा आणि ३५ वर्षीय सीनीत दोन्ही राजाच्या महालात सिनियर ऑफिसरच्या रूपात काम करत होत्या. सुथिडाने आधी थायलँड एअरवेजमध्ये फ्लाईट क्रू च्या रूपात काम केले होते. सीनीत ही आर्मी नर्स होती.(Image Credit-AFP)
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलThailandथायलंड