Walmart employee rampage car through stores front door after fired from job
नोकरीवरून काढलं; म्हणून त्यानं वचपा काढण्यासाठी सुपरमार्केटवर चालवली कार By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2021 4:24 PM1 / 7नोकरीवरून काढून टाकणं कोणासाठीही अपमानकारक ठरू शकतं. असा प्रसंग घडल्यानंतर काही लोक स्वतःला दोष देत शांत राहतात. तर काहीजण आपला अपमान सहन करू शकत नाहीत म्हणून सुडबुद्धीनं वागण्याचा प्रयत्न करतात. अमेरिकेत अशीच घटना समोर आली आहे. 2 / 7वॉलमार्टमधून एका व्यक्तीला कामावरून काढून टाकण्यात आलं. म्हणून त्यानं रागात स्टोरच्या गेटला तोडण्याचा प्रयत्न केला आणि हे सुपरमार्केट उद्धवस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. 3 / 7ही घटना अमेरिकेतील उत्तर कैरोलिनाच्या कॉर्नकॉर्डमधील थंडर रोडवरील वॉलमार्ट स्टोरची आहे. ३२ वर्षीय आरोपीनं आपली कार गेटमध्ये घुसवत सुपरमार्केटचं नुकसान केलं आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोतून आरोपीला अटक केली असून सरकारी अधिकाऱ्यावर हल्ला करणं आणि सुपरमार्केटचं नुकसान करण्याचा आरोप लावण्यात आला आहे.4 / 7अमेरिकेच्या fox5ny.com च्या न्यूजच्या रिपोर्टनुसार या आरोपीचे नाव जेंट्री आहे. नोकरीवरून काढलं म्हणून वॉलमार्टबद्दल त्याच्या मनात प्रचंड राग होता. 5 / 7नोकरीवरून हटवल्यानंतर त्यादिवशी तो आपल्या घरी आला आणि पुढल्या दिवशी सकाळी सुपरमार्केटमध्ये जाऊन हल्ला केला. यावेळी वॉलमार्टचं गेट तोडून त्यानं आत प्रवेश केला आणि सगळ्या वस्तू खाली फेकून दिल्या.6 / 7कॉनकॉर्ड पोलिसांनी फेसबुकवर याबाबत माहिती दिली आहे. जेव्हा पोलिस त्या ठिकाणी पोहोचले तेव्हा आरोपी कार चालवून सुपरमार्केटच्या आत पोहोचला होता. 7 / 7पोलिसांकडून आरोपीचा फोटो शेअर करण्यात आला असून या माणसाला कोणतीही दुखापत झालेली नाही. पण तोंडावर थकवा जाणवत होता. (Image Credit- आणखी वाचा Subscribe to Notifications