शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जाणून घेऊयात सोनूच्या स्माइलमागचं व्हायरल सत्य !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2020 3:09 PM

1 / 17
मागील एक-दोन दिवसांपासून सोशल मीडियावर एका सोनू नावाच्या 'स्माईल मॅनचा' व्हिडिओ व्हायरल होतोय.. कोण आहे हा 'सोनू' ? चला तर मगं जाणून घेऊयात या व्हायरल सोनूची व्हायरल गोष्ट..
2 / 17
इंटरनेटच्या आजच्या जगात कधी कोण 'फेमस' होईल याचा काही नेम नाही
3 / 17
आता अशाचप्रकारे केवळ आपल्या एका स्माईलच्या जोरावर सोनू नावाचा एक तरुण प्रकाशझोतात आला आहे.
4 / 17
टीक टॉकवर दानिश नावाच्या एका युझरने एक व्हिडिओ शेअर केला आहे
5 / 17
सध्या फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोच्या एका डिलिव्हरी बॉयचा ‘हॅप्पी रायडर’ची जोरदार चर्चा सुरू आहे
6 / 17
एका स्माइलमुळे इंटरनेट सेंसेशन झालेल्या सोनूचं निरागस हास्य पाहून झोमॅटोनेही त्याची दखल घेतलीये.
7 / 17
सोशल मीडियावर आपल्या एका स्माइलमुळे प्रेमात पाडणाऱ्या सोनूचे फोटो झोमॅटो इंडियाने आपल्या ट्विटरचा प्रोफाईल म्हणून ठेवला आहे
8 / 17
आता हे अकऊंट Happy Rider साठी फॅन अकाऊंटसारखं काम करेल असं कॅप्शन कंपनीने दिलं आहे.
9 / 17
त्यानंतर आता सोनूच्या स्माईलची भूरळ वेफर्स बनवणारी देशातील प्रसिद्ध कंपनी Lays India लाही पडली आहे.
10 / 17
Lays India ने थेट आपल्या चिप्सच्या पाकिटावरच सोनूचा फोटो वापरलाय.
11 / 17
'एक स्माईलने कोट्यवधी लोकांचं हृदय जिंकता येतं', अशा मेसेजद्वारे Lays ने सोनूच्या फोटोसह चिप्सच्या पाकिटाचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलाय.
12 / 17
सोनूचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटकरी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. तर काहीजण मिम्स देखील शेअर करत आहेत.
13 / 17
सोनूचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सोनूच्या कमाईबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्याने हसत हसत त्याची उत्तर दिली
14 / 17
त्याच्या स्माईलची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली. डिलिव्हरी बॉय आणि त्याच्या स्मित हास्याबद्दलच्या सकारात्मकतेनं सर्वांच्या मनाववर भुरळ घातली आहे.
15 / 17
जेव्हा दानिश सोनूला त्याच्या कमाईबद्दल विचारतो तेव्हा तो सांगतो की तो 12 तास काम करतो. आणि त्यासाठी त्याला Rs 350. रुपये मिळतात.
16 / 17
त्यानंतर, जेवणाबद्दल विचारले असता सोनू म्हणतो की हो, रद्द केलेला ऑर्डर त्यांना मिळतात. या प्रश्नाचे उत्तर देताना सोनू म्हणतो की कंपनीत कोणतीही अडचण नाही. कंपनी वेळेवर पैसे आणि जेवण देते.
17 / 17
झोमॅटोच्या या डिलिव्हरी बॉयचा फोटो पुणे आणि महाराष्ट्र पोलिसांनीही ट्विट करत भन्नाट कॅप्शन्स दिले आहेत . या सोनूच्या स्माईलची जगभरात आता चर्चा होत आहे.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलZomatoझोमॅटो