Well fell down 13 year old-boy hospital doctor munger bihar
४० फुट खोल विहिरीतून येत होते विचित्र आवाज; अन् जवळ गेल्यावर गावकऱ्यांना दिसलं असं काही... By manali.bagul | Published: September 29, 2020 8:08 PM1 / 6बिहारच्या गावात दिवसाढवळ्या एक धक्कादायक प्रकार घटला आहे. बिहारच्या मुंगेर गावात एका 40 फूट खोल कोरड्या विहिरीतून अचानक चित्र विचित्र आवाज यायला सुरूवात झाली. 2 / 6विहिरीतून अचानक आवाज ऐकू येत असल्यामुळे संपूर्ण गावातील लोकांमध्ये भीती होती. घाबरून कोणीही विहीरीच्या आत पाहण्याची हिंमत करायला तयार नव्हतं. काही वेळानंतर गावातील लोकांनी विहीरीतील आवाज नेमका कुठून आणि का येतोय याचा शोध घेतला. त्यानंतर सगळ्याना धक्काच बसला. 3 / 6४० फुट खोल असलेल्या विहिरीत एक मुलगा पडला होता आणि मदतीसाठी हा मुलगा आवाज देत होता. सोनू कुमार चौरसिया आपल्य़ा १३ वर्षीय मुलासोबत मॉर्निंग वॉकसाठी गेले. 4 / 6अचानक मुलगा अभिषेककुमार विहिरीवर चढून फुलं काढत असताना तोल जाऊन 40 फूट खोल विहिरीत पडला. अभिषेकचा आवाज ऐकून आसपासचे लोक विहिरजवळ जमा झाले होते. विहिरीत तोल गेल्यामुळे पडलेला अभिषेककुमार आपल्या वडिलांना आवाज देत होता. लोकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस आणि रेस्क्यू ऑपरेशन पथक घटनास्थळी दाखल झाले.5 / 6बचाव मदत दल दोरीने विहिरीत उतरले तेव्हा तेथे ऑक्सिजनची कमतरता भासली. मात्र त्यांनी मुलाला दोरीने बांधलं. रेस्क्यू ऑपरेशन करणारे विहिरीत उतरले तेव्हा त्यांना विहिर कोरडी असल्याचे कळले. मात्र दोरीला बांधून अभिषेकला बाहेर काढण्यात आले. जोरात आदळल्यामुळे अभिषेक जखमी अवस्थेत होता. 6 / 6जोरात आदळल्यामुळे अभिषेक जखमी अवस्थेत होता. तब्बल अडीच तास अभिषेक विहिरित अडकून होता. त्याला त्वरित जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे वैद्यकीय सुविधांचा अभाव होता म्हणून. कुटुंबियांनी प्रशासनाकडे तक्रार केली त्यानंतर उपस्थित डॉक्टरांनी मुलावर उपचार सुरू केले. आणखी वाचा Subscribe to Notifications