लग्नसोहळा सुरू असतानाच मेहुणीने सर्वांसमोर घेतला नवरदेवाचा किस आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2021 11:04 IST
1 / 8भारतातील विवाहसोहळे हे वैशिष्ट्यपूर्ण असतात. वऱ्हाड्यांची गर्दी गमती जमती हे तर या विवाहसोहळ्यांचे खास वैशिष्ट्यच असते. मग मेहुणीचा विषय असेल तर थट्टामस्करी होणे साहजिकच आहे. मात्र येथे एका अशा विवाहसोहळ्याची चर्चा सुरू आहे. ज्यात वधूच्या बहिणीने ऐन विधी सुरू असताना नवरदेवाला सर्वांसमक्ष किस केला. त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्यांना आश्चर्याचा धक्का बसला. दरम्यान हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर झाला असून, त्यावर युझर्सकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. 2 / 8विवाहसोहळ्यादरम्यान वधू-वरांकडून एकमेंकांना माळा घालण्याचा कार्यक्रम सुरू होता. वधूवरांनी एकमेकांना माळा घातल्यानंतर स्टेजवर फोटोसेशन सुरू झाले. यावेळी नवरदेवाची मेहुणी त्याच्या जवळच बसली होती. 3 / 8या दरम्यान, तिला विवाहसोहळ्यात गंमत करण्याची लहर आली. तिने नवऱ्याला पकडले आणि सर्वांसमक्ष किस केले. ऐन लग्नात मेहुणीने केलेल्या या कृतीमुळे नवरदेवमात्र लाजून चूर झाला. 4 / 8स्टेजवर घडलेला हा प्रकार पाहून उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र नवऱ्यासोबत मेहुणीने केलेल्या या गमतीचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 5 / 8या व्हिडीओवर नेटिझन्सकडून वेगवेगळ्या कमेंट्सही दिल्या जात आहेत. हा प्रकार खूप लाजीरवाणा असल्याचे एकाने म्हटले आहे. 6 / 8ही बाब चुकीची आहे. मेहुणीने जे कृत्य केले तेच जर नवरदेवाने केले असते तर त्याला लोकांना चपलांनी मारले असते, असे एका युझरने म्हटले आहे. 7 / 8तर एक अजून युझर म्हणाला की, ही मेहुणी नाही तर मेहुणा आहे. मात्र काही असले तरी इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर झाल्यानंतर लाईक्स आणि कमेंट्सची लाट आली आहे. 8 / 8इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत तब्बल १५०० हून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. तर कमेंट्स येण्याचा क्रमही सुरू आहे.