Who are these women IAS officers who came into the limelight due to their expensive belts? See photo
Sonal Goel: महागड्या बेल्टमुळे चर्चेत आलेल्या या महिला आयएएस अधिकारी आहेत तरी कोण? पाहा फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 4:13 PM1 / 7महागड्या बेल्टमुळे सध्या एक महिला आयएएस अधिकारी चर्चेत आल्या आहेत. त्यांच्या बेल्टची किंमत ७१ हजार रुपये असल्याचा दावा सोशर मीडियावर केला जात आहे. या महिला आएएस अधिकाऱ्याचे नाव आहे सोनल गोयल. त्या सोशल मीडियावर बऱ्यापैकी अॅक्टिव्ह असतात. तसेच त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. 2 / 7१२ फेब्रुवारी रोजी त्यांनी ट्विटरवर आपले दोन फोटो शेअर केले होते. या फोटोमध्ये त्यांनी खूप सुंदर आणि स्टायलिश बेल्ट परिधान केलेला दिसत आहे. तो बेल्ट पाहून लोक तो गुची ब्रँडचा बेल्ट असल्याचा दावा करत आहेत. ही इटालियन कंपनी असून, हा ब्रँड खूप महागडा असल्याचे मानले जाते. भारतामध्ये या बेल्टची किंमत सुमारे ७१ हजार रुपये असल्याचा दावा केला जातो. 3 / 7सोनल गोयल यांची एक वेबसाईटसुद्धा आहे. तिथे त्यांच्याबाबत संपूर्ण माहितीसुद्धा शेअर करण्यात आलेली आहे. त्यातील माहितीनुसार त्या गेल्या १३ वर्षांपासून सरकारी अधिकारी म्हणून काम करत आहेत. त्या सध्या स्पेशल रेसिडेंट कमिश्नर या पदावर त्रिपुरा भवनमध्ये तैनात आहेत. 4 / 7सिव्हिल सेवा परीक्षेमध्ये सोनल गोयल यांना १३ वी रँक मिळाली होती. त्या त्रिपुरा कॅडरमधील आहेत. त्यानंतर डेप्युटेशनवर त्या चार वर्षांसाटी हरियाणा कॅडरमध्ये दाखल झाल्या होत्या. 5 / 7जुलै २०१६ मध्ये त्या हरियाणा कॅडरमध्ये दाखल झाल्या होत्या. गुरुग्राम मेट्रॉपॉलिटन सिटी बस लिमिटेडच्या सीईओ आणि गुरुग्राम मेट्रोपॉलिटन डेव्हलपमेंट अॅथॉरिटीच्या अतिरिक्त सीईओ म्हणून त्यांनी त्यांच्या अखेरच्या पोस्टिंगवर काम केले होते. 6 / 7सोनल गोयल यांचा सप्टेंबर २०१६ मध्ये नीती आयोग, संयुक्त राष्ट्र आणि MyGov कडून भारत बदलणाऱ्या पहिल्या २५ महिलांमध्ये स्थान मिळाले होते. 7 / 7सोनल गोयल ह्या पानीपत, हरयाणा येथे राहणाऱ्या आहेत. त्यांचे शिक्षण दिल्लीमध्ये झाले आहे. त्यांनी आपले शालेय शिक्षण डीएव्हीमधून केले. कर श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स, डीयूच्या माजी विद्यार्थिनी आहेत. त्यांनी आयसीएसआय, नवी दिल्लीमधून सीएस सुद्धा आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications