Who is Payal Dhare aka Payal Gaming The Award Winning Indian Gamer Who Met PM Modi
पंतप्रधान मोदींसोबत फोटोत असलेली पायल धारे नक्की कोण आहे? जाणून घ्या तिच्याबद्दल... By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 4:42 PM1 / 13Who is Payal Dhari meets Pm Modi Gamers: पंतप्रधान मोदींनी नुकतीच गेमिंग इंडस्ट्रीमधील टॉपच्या खेळाडूंची भेट घेतली. गेमिंग क्षेत्राच्या भविष्याबाबत चर्चा करण्यासाठी त्यांनी गेमर्सशी चर्चा केली.2 / 13या भेटीत मोदी गेमिंग इंडस्ट्रीच्या वाढीबद्दल आणि देशात करिअर म्हणून गेमिंगची संकल्पना याबद्दल बोलले.3 / 13मोदींसोबतच्या बैठकीत अनिमेश अग्रवाल, मिथिलेश पाटणकर, तीर्थ मेहता, नमन माथूर, अंशु बिश्त, गणेश गंगाधर यांच्यासह एकमेव मुलगी पायल धारे सहभागी झाली होती. जाणून घेऊया तिच्याबद्दल...4 / 13पायल धारे ही 'पायल गेमिंग' या टोपणनावानेही ओळखली जाते.5 / 13ती भारतातील सर्वात लोकप्रिय महिला गेम क्रिएटर्सपैकी एक आहे.6 / 13पायल धारे ही मूळची मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील एक छोटेसे खेडे असलेल्या उमरानाला गावाची आहे.7 / 13पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीबद्दल बोलताना तिचे वडील शिवशंकर धारे म्हणाले की, 'मला माझ्या लेकीचा खूप अभिमान आहे.8 / 13पायलच्या वडिलांनी सांगितले की, 'मोदींनी जेव्हा तिला भेटायला बोलावले तेव्हा मला खूप आनंद झाला. देशाच्या पंतप्रधानांसोबत बसून गेमिंग खेळणे हे अविश्वसनीय आहे. आता मला भेटणारा प्रत्येकजण म्हणतो की पायलचा गावाला आणि जिल्ह्याला अभिमान वाटतो.9 / 13या वर्षी मार्चमध्ये पायलने 'गेमिंग क्रिएटर ऑफ द इयर' पुरस्कार जिंकला. अवॉर्ड नाईटचे फोटो शेअर करत तिने लिहिले होते की, 'तुमच्या सततच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार.'10 / 13पायलचा जन्म १८ सप्टेंबर २००० चा आहे. त्यामुळे केवळ २३ वर्षांची आहे. पण इतक्या वयातही तिने अनेक पुरस्कार मिळवले आहेत.11 / 13तिने गेल्या वर्षी 'डायनॅमिक गेमिंग क्रिएटर ऑफ द इयर'चा पुरस्कारही जिंकला होता. तिला फिमेल स्ट्रीमर ऑफ द इयरचा किताबही मिळाला आहे.12 / 13गेमिंग व्यतिरिक्त पायल उद्योजिका आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ती तिची स्वत:ची एक मर्चेंडाईज लाइनदेखील चालवते.13 / 13तिच्या मर्चेंडाईज लाइनचे नाव ThriftExploy आहे. मोदींशी भेटीनंतर सध्या तिच्या चाहत्यावर्गात तुफान वाढ झाली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications