The Worlds 10 Best Designed Bus Stations
बाबो! बस स्टॉप आहेत की, फाइव्ह स्टार हॉटेल? तुमचाही विश्वास बसणार नाही.... By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 3:50 PM1 / 11तुम्ही जगभरातील वेगवेगळे सुंदर एअरपोर्ट्स पाहिले असतील. पण कधी तुम्ही जगातले फाइव्ह स्टार हॉटेलसारखे दिसणारे बस स्टॉप पाहिलेत का? नाही ना? जगात असेही काही बस स्टॉप आहेत जे सोयी-सुविधेबाबत एअरपोर्टपेक्षा जराही कमी नाही. असेच काही बस स्पॉप आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. जे बघून तुमचा विश्वास बसणार नाही. (Image Credit : www.designcurial.com)2 / 11१) हॉलॅंड - हॉलॅंडचा हा बस स्टॉप जगातील सर्वात सुंदर बस स्टॉपैकी एक आहे. हे २००३ मध्ये तयार करण्यात आलं होतं. हे तयार करण्यासाठी सिंथेटिक पॉलिएस्टरचा वापर करण्यात आला. 3 / 11२) पोर्तुगाल - एखाद्या फाइव्ह स्टार हॉटेलसारखं दिसणारा हा बस स्टॉप पोर्तुगालच्या सर्वात सुंदर आणि आधुनिक बस स्टॉपपैकी एक आहे. इथे एकत्र ९६ बसेस पार्क करण्याची क्षमता आहे. हे पूर्णपणे काचापासून तयार करण्यात आलं आहे. 4 / 11३) ब्रिटेन - ब्रिटेनच्या बर्कशायरमध्ये Slough बस स्टॉप एखाद्या हॉटेलसारखं वाटतं. या स्टॉपमध्ये लोकांच्या सुविधेसाठी सर्वच सेवा आहेत. 5 / 11४) स्वित्झर्लॅंड - स्वित्झर्लॅंडच्या अराउमध्ये असलेला हा बस स्टॉप एखाद्या पाइव्ह स्टार हॉटेलसारखाच आहे. मोठमोठ्या खांबांच्या आधारावर उभ्या या बस स्टॉपचं छत हे पॉलीथीन ट्यूबच्या मदतीने तयार करण्यात आली आहे. 6 / 11५) ब्रिटन - ब्रिटनच्या Preston Bus Station वेस्टर्न यूरोपचं सर्वात मोठं बस स्टॉप आहे. ११०० कार आणि ८० डबल डेकर बसेसची इथे क्षमता आहे. 7 / 11६) क्रोशिया - क्रोशियाच्या Osijek चं बस स्टॉप ड्रावा नदीच्या किनाऱ्यावर आहे. अत्याधुनिक सुविधा असलेल्या या बस स्टॉपव १६ बस प्लॅटफॉर्म आहेत. 8 / 11७) लंडन - २००५ मध्ये तयार करण्यात आलेलं लंडनचं Vauxhall Bus Station हे जगातल्या सर्वात सुंदर बस स्टॉपपैकी एक आहे. हे पूर्णपणे स्टेनलेस स्टीलने तयार करण्यात आलं आहे. 9 / 11८) फ्रान्स - फ्रान्सचं Thiais बस स्टेशन त्याच्या अनोख्या डिझाइनसाठी ओळखलं जातं. पॅरिस शहरात असलेला हा बस स्टॉप नेहमी वेगवेगळ्या रंगांमध्ये दिसतो. 10 / 11९) जर्मनी - जर्मनीच्या या बस स्टॉपला २००९ मध्ये Hamburg Architecture and Engineering Association ने बेस्ट बिल्डींगचा पुरस्कार दिला होता. 11 / 11१०) ब्रिटन - ब्रिटनचं Poole बस स्टेशन हे ४० वर्ष जुनं आहे. पण आजही हे शानदार दिसतं. वेगवेगळ्या रंगांमुळे आणि कलाकृतींमुळे या बस स्टेशनची शान आणखी वाढते. आणखी वाचा Subscribe to Notifications