शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जगातील सर्वात शापित बाहुली; ज्यांनी ती जवळ ठेवली, त्यांचे आयुष्य झाले उद्ध्वस्त, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2022 10:38 AM

1 / 9
जगात अशा अनेक रहस्यमय गोष्टी आहेत ज्याचा अजुनही उलघडा झालेला नाही. अशीच एक शापीत बाहुली आहे, ही बाहुली ज्यांच्या जवळ ठेवली, त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अनेकांनी या बाहुलीला नाकारले आहे.
2 / 9
ही बाहुली फ्लोरिडा येथे राहणाऱ्या रॉबर्ट यूजीन ओट्टो या मुलाला त्याच्या नोकराने १९०६ मध्ये दिली होती. या नोकराला काळी जादू माहीत होती, असं म्हणतात. त्याला रॉबर्ट यूजीनचे कुटुंब अजिबात आवडत नव्हते. परस्पर वैमनस्यातून त्या नोकराने या बाहुलीवर काळी जादू केली. आणि ती बाहुली रॉबर्टला दिली.
3 / 9
लहान रॉबर्टला ही बाहुली मिळाल्याने त्याला खूप आनंद झाला. त्याने या बाहुलीला आपला सर्वात चांगला मित्र म्हणून स्वीकारले होते. तो बाहुलीला दिवसभर आपल्या सोबत ठेवायचा. रॉबर्ट दर आठवड्याला बाहुलीला शॉपींगसाठी घेऊन जायचा.आणि त्या बाहुलीसाठी आपल्याच खोलीत वेगळे कपाट देखील होते. रॉबर्टने बाहुलीला नवीन कपडे घातले.
4 / 9
रॉबर्टला बाहुलीमध्ये इतका वेड होता की तो तिला खरी व्यक्ती मानू लागला. यावेळीच त्याच्या लक्षात आले की घरातून वस्तू हळूहळू गायब होत आहेत. अनेकदा रॉबर्टची खोली गडबलेल्या अवस्थेत असायची. रॉबर्ट त्याच्या पालकांना सांगायचा की बाहुलीने खोलीत गोंधळ निर्माण केला आहे, तेव्हा कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. यासाठी पालकांनी रॉबर्टला अनेकदा खडसावले.
5 / 9
एक दिवस रात्री उशीर झाला होता, तेव्हा रॉबर्टने पाहिले की बाहुली त्याच्यासमोर बसली होती, ती झोपत नव्हती आणि सतत त्याच्याकडे पाहत होती. हे पाहून रॉबर्टला भीती वाटली. खोलीत ठेवलेल्या खुर्च्या स्वतःहून हवेत उडू लागल्याचे त्याने पाहिले. कधी दार स्वतःच उघडत होते तर कधी बंद होत होते. हे सर्व पाहून रॉबर्टच्या तोंडातून एक किंकाळी निघाली. रॉबर्टच्या ओरडण्याचा आवाज ऐकून त्याचे आई-वडील लगेच खोलीत आले. यावेळी त्यांना घरात चोर शिरला असावा, असे वाटले. यावेळी खोलीच्या एका कोपऱ्यात रॉबर्ट घाबरून बसला होता. त्याचवेळी खोलीत इकडे तिकडे वस्तू विखुरल्या होत्या. आणि बाहुलीही तिथेच होती.
6 / 9
या घटनेनंतर रॉबर्ट बाहुलीच्या जास्तच जवळ गेला. दिवसभर तो त्या बाहुलीशी एकटाच बोलायचा. त्यांच्या शेजाऱ्यांनीही सांगितले की त्यांनी रॉबर्टला त्या बाहुलीशी बोलताना अनेकदा पाहिले आहे. ती बाहुलीही त्या मुलाशी बोलते. एवढेच नाही तर घरात कोणी नसताना ती बाहुली घराच्या आत फिरतानाही त्यांनी पाहिली आहे. पुढ रॉबर्टच्या पालकांना त्याच्या खोलीतून रोज विचित्र आवाज ऐकू येऊ लागले. हा आवाज मोठ्या माणसासारखा होता. आवाज ऐकून ते रॉबर्टच्या खोलीत गेल्यावर त्यांना खोलीत फक्त रॉबर्ट आणि बाहुली दिसायची. त्यांनी रॉबर्टला त्या आवाजाबद्दल विचारले की तो थेट त्या बाहुलीकडे बोट दाखवायचा.
7 / 9
अशा भीतीदायक घटना घडत होत्या. रॉबर्टच्या घरातच नाही तर आता त्यांच्या शेजाऱ्यांसोबतही विचित्र घटना घडू लागल्या होत्या. त्यांच्या घरातील सामानही त्याच अवस्थेत विखुरले जाऊ लागले. हळूहळू या बाहुलीची माहिती संपूर्ण शहराला माहित झाली. पुढ एक दिवस रॉबर्टच्या पालकांनी त्या बाहुलीला एक पेटीत ठेवली. त्यानंतर अशा घटनांची मालिका थांबली. यानंतर रॉबर्टही हळूहळू मोठा झाला आणि न्यूयॉर्कला जाऊन शिक्षण घेतले. त्यानंतर शिक्षण पूर्ण करून तो पॅरिसला आला. पुढ त्याने लग्न केले. लग्न करून दोघेही अमेरिकेत परतले. रॉबर्टने जुन्या घरातून सर्व काही उचलले आणि पत्नीसह नवीन घरात शिफ्ट झाला. रॉबर्टने घरातून उचललेल्या वस्तूंमध्ये त्या बाहुलीचा समावेश होता.
8 / 9
तेव्हाही रॉबर्ट त्या बाहुलीला विसरला नव्हता. त्याने नवीन घरात बाहुलीसाठी एक खोलीही करून दिली. त्या खोलीत अनेक खेळणीही ठेवण्यात आली होती. रॉबर्ट बायकोला सांगतो की ही खेळणी त्या बाहुलीसाठी ठेवली आहेत. जेव्हा पत्नीला हे सर्व कळले, तेव्हा काही वेळातच तीही रॉबर्टच्या कृत्याने अस्वस्थ झाली. तिने रॉबर्टला विनवणी केली की बाहुली खोलीतून बाहेर काढू . १९७४ मध्ये रॉबर्टचा मृत्यू झाला. त्यानंतर हे घर दुसऱ्या कुटुंबाने विकत घेतले. त्या कुटुंबात राहणाऱ्या एका लहान मुलीने ही बाहुली पाहिल्यानंतर ती डब्यातून बाहेर काढून ठेवली. पुन्हा एकदा घरात भीतीदायक गोष्टी घडू लागल्या. यावेळी मुलीने घरच्यांना बाहुली जिवंत असल्याचे सांगितले.
9 / 9
या घटनांमुळे घाबरून मुलीच्या पालकांनी ती बाहुली फ्लोरिडा येथील ईस्ट मार्टेलो म्युझियमला १९९४ मध्ये दान केली,पण येथेही बाहुलीचा भयावह कृत्य सुरूच राहिले. ही बाहुली संग्रहालयात एका काचेच्या पेटीत ठेवण्यात आली होती. कितीतरी वेळा बाहुली सोडली तर म्युझियममधले सगळे इकडे तिकडे विखुरलेले असायचे. रात्री म्युझियममधून मुलाच्या रडण्याचेही आवाज येऊ लागले. संग्रहालयाच्या शेजारी राहणाऱ्या लोकांनी ही तक्रार संग्रहालयातील लोकांकडे केली. नंतर म्युझियमच्या लोकांनी या बाहुलीसाठी एक वेगळी खास केबिन बनवली, ज्यामध्ये ती बाहुली आजही आहे, कोणीही या बाहुलीचा फोटो तिच्या परवानगीशिवाय काढला तर ही बाहुली त्या व्यक्तीला शाप देते असं म्हणतात.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल