शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

"ठाऊक नाही, कोणती भेट अखेरची ठरेल"; रतन टाटांचा PS शांतनुची भावूक पोस्ट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2022 12:18 PM

1 / 10
देशातील सर्वात मोठे उद्योगपती टाटा सन्सचे मानद चेअरमन रतन टाटा(Ratan Tata) यांचा सहाय्यक शांतनु नायडू(Shantanu Naidu) याने लिहिलेली एक पोस्ट सध्या खूप व्हायरल होत आहे. शांतनु वृद्धांच्या सेवेसाठी एक स्टार्टअप गुड फेलोज चालवतो. ज्यात रतन टाटानेही गुंतवणूक केलीय.
2 / 10
शांतनुने सोशल मीडियावर अकाऊंड लिंक्वइनवर गुडफेलो इंडिया सुरु करण्याबाबत सांगितले. त्याने अशा २ व्यक्तींच्या नावाचा उल्लेख केला आहे. गुडफेलो इंडिया सुरु करण्याच्या प्रश्नावर माझ्यासमोर एका पंजाबी दाम्पत्याचा चेहरा उभा राहतो असं त्याने म्हटलं.
3 / 10
बिझनेज टूडेमध्ये शांतनुने पंजाबी दाम्पत्याबद्दल कहाणी सांगितली की, ज्यांनी ५ वर्षापूर्वी माझं मुंबईत एका अपार्टमेंटमध्ये स्वागत केले होते. कोविड १९ च्या काळात त्या दाम्पत्याने कशारितीने देखभाल केली होती याचा अनुभव त्याने शेअर केला.
4 / 10
या सेवेबद्दल शांतनुने त्यांच्यासोबत वेळ घालवण्याचं ठरवलं होते. मला त्या दाम्पत्यांना काही द्यायचं होतं ते म्हणजे वेळ असं शांतनु म्हणाला. ते वयस्क बुधवारी ८६ वर्षांचे असताना निघून गेले. त्यांच्या प्रेमानं माझ्या मनावर खूप प्रभाव पाडला होता.
5 / 10
जेव्हा कधीही मला कुणी विचारलं गुडफेलो सुरू का केले? तेव्हा नेहमी त्या पंजाबी दाम्पत्याचा चेहरा आठवतो. अखेरचं मिस्टर पंजाबी यांच्यासोबत मुंबईच्या गुडफेलो कार्यक्रमात भेट झाली होती. ते यावर्षी खूप आठवतील. कुणालाही माहिती नसतं शेवटची भेट कधी होईल? ही भावूक पोस्ट व्हायरल झालीय.
6 / 10
शांतनू हा रतन टाटांचा पर्सनल सेक्रेट्ररी म्हणजेच स्वीय सहाय्यक आहे. रतन टाटा तरुणांमध्ये खूपच लोकप्रिय आहेत. मात्र खूपच कमी लोकांना माहिती असेल की, ८५व्या वर्षात पदार्पण रतन टाटांचा स्वीय सहाय्यक म्हणून काम करणारा मुलगा केवळ ३१ वर्षांचा आहे.
7 / 10
खुद्द रतन टाटा यांनी फोन करुन, तू माझ्याबरोबर काम करणार का? अशी विचारणा शांतनूला केली होती. यावर विश्वास बसणे फारच अवघड आहे. मात्र, खरोखरच रतन टाटांनी शांतनू नायडू या तरुणाला फोन करुन स्वत: कामाची ऑफर दिली होती.
8 / 10
यासंदर्भातील शांतनूचा प्रवास सांगणारी एक पोस्ट व्हायरलही झाली होती. एका वृत्तानुसार, शांतनू हा रतन टाटांबरोबर अनेक ठिकाणी फिरतो. अनेकदा नवीन स्टार्टअप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासंदर्भात सल्ले रतन टाटा शांतनूकडून घेतात, असेही सांगितले जाते.
9 / 10
वृद्ध व्यक्तींना आधार देण्यासाठी गुडफेलो नावाचं स्टार्टअप सुरू करण्यात आले. टाटा यांनी या स्टार्टअपचं उद्धाटन करताना या स्टार्टअपसोबत पुढे जाण्यास आनंद वाटेल असं म्हटलं होते. शांतनूने टाटा यांच्यासोबत अनुभवांवर I Came Upon a LightHouse नावाचं पुस्तक लिहिलं आहे.
10 / 10
भटक्या श्वानांसाठी केलेल्या कामामुळे रतन टाटा यांची शांतनूसोबत जवळीक वाढली. मुंबईत राहणारा शांतनू यांच्या कामाने टाटा खूप प्रभावित झाले होते. २०१८ पासून रतन टाटा यांच्यासोबत शांतनू काम करत आहे.
टॅग्स :Ratan Tataरतन टाटा