शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लक्ष दीपोत्सवाने उजळले सोलापूर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 2:47 PM

1 / 9
‘लोकमत’च्या संकल्पनेतून लक्ष दीपोत्सव... सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’च्या संकल्पनेतून आणि विविध सेवाभावी संस्थांच्या वतीने जातीधर्माच्या भिंती दूर सारून सर्वधर्मीयांचा लक्ष दीपोत्सव सोहळा शुक्रवारपासून सुरू झाला़ सायंकाळी लक्ष-लक्ष दिव्यांनी मंदिर अन् तलाव परिसर असा उजळून निघाला. या नयनरम्य सोहळ्याची टिपलेली ही छायाचित्रे.
2 / 9
गणपती घाटावर सोलापूरकरांनी हजारो पणत्या प्रज्वलित केल्यानंतरचे मनोहारी दृश्य.
3 / 9
सुवासिनींनी दीपोत्सवात आमचाही सहभाग या जाणिवेतून पणती प्रज्वलित करून ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या चरणी आपली सेवा रुजू केली.
4 / 9
श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरातील गणपती घाट येथील दीपोत्सवामध्ये सहभागी होऊन श्रीमन् नारायण सेवा संस्था आणि श्री मार्कंडेय जनजागृती संघाच्या सदस्यांनी पणत्या प्रज्वलित करून ‘लोकमत’चे नाव साकारले.
5 / 9
दीपोत्सवात सहभागी होऊन दीप प्रज्वलित करताना रेश्मा मुल्ला यूथ फाउंडेशनच्या रेश्मा मुल्ला आणि सहकारी.
6 / 9
दीपोत्सवाचे औचित्य साधून सिद्धेश्वर मंदिरात एम. ए. पटेल फायर वर्क्सचे के. एम. पटेल आणि त्यांचे चिरंजीव हुसेन पटेल यांच्या वतीने शोभेच्या दारूची आतषबाजी होताना दिवाळीचा माहोल या निमित्ताने दिसून आला. यात्रेतील शोभेच्या दारूकामाचा आनंदही भाविकांनी लुटला.
7 / 9
मंत्रोच्चारात जंगम समाजातील बटूंनी दीपोत्सवात सहभाग नोंदवला.
8 / 9
सोलापूरकरांनी प्रज्वलित केलेल्या पणत्यांचे तलावातील पाण्यामध्ये उमटलेले प्रतिबिंब पाहून अनेकांनी हे दृश्य आपल्या मोबाईलमध्ये कैद केले.
9 / 9
कलाकार प्रवीण हक्के यांनी सोन्याचा मुलामा असलेल्या रथातून श्री सिद्धरामेश्वरांची मूर्ती ठेवून ती मिरवणुकीने दीपोत्सवस्थळी आणली. याकामी सामाजिक कार्यकर्ते सकलेश बाभूळगावकर यांचे विशेष सहकार्य लाभले. दीपोत्सवात सहभागी भाविक रथासमवेत सेल्फी काढतानाचे चित्रही दिसत होते.
टॅग्स :SolapurसोलापूरSiddheshwar Templeसिध्देश्वर मंदीरLokmatलोकमत