डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्रं; धक्कादायक माहिती उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 15:25 IST
1 / 9सोलापूरमधील प्रख्यात डॉक्टर शिरीश वळसंगकर यांनी स्वत:वर गोळी झाडून घेत जीवन संपवलं होतं. या घटनेमुळे सोलापूरसह राज्यसभरात खळबळ उडाली होती.2 / 9आता या प्रकरणी वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं असून, डॉ. वळसंगकर यांची एक सुसाईड नोट सापडल्यानंतर वळसंगकर यांच्या रुग्णालयात अधिकारी असलेल्या मनीषा मुसळे माने या महिलेला अटकही करण्यात आली आहे. 3 / 9दरम्यान, या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. आज डॉ. वळसंगकर यांचा मुलगा डॉ. आश्विन आणि सून डॉ. सोनाली यांचा पोलिसांनी जबाब घेतला. पोलिस आता रुग्णालयातील इतर काही कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवणार आहेत.4 / 9तर दुसरीकडे मनीषा मुसळे- माने यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्यांचीही चौकशी सुरू केली आहे.5 / 9डॉ. शिरीष वळसंगकर यांनी काही वर्षांपूर्वीच आपल्या हॉस्पिटलची पूर्ण जबाबदारी मुलगा डॉ. आश्विन आणि सून सोनाली यांच्यावर सोपवली होती. तर हॉस्पिटलमधील संपूर्ण कारभार या प्रशासकीय अधिकारी म्हणून मनीषा मुसळे-माने पाहत होत्या. 6 / 9काही दिवसापासून रुग्णालयातील रुग्णांचा उपचार आणि प्रशासकीय कामामुळे ताण वाढला होता. यामुळे डॉ.शिरीष वळसंगकर यांनी पुन्हा एकदा रुग्णालयातील कामावर लक्ष घातले होते. 7 / 9डॉ. वळसंगकर यांनी रुग्णालयाची सर्व सूत्र हाती घेतल्यानंतर मनीषा मुसळे -माने हिच्याविरोधात गैरव्यवहाराच्या तक्रारी आल्या होत्या. 8 / 9यामुळे मुसळे-माने हिचे सर्व अधिकार कमी केले होते. यामुळेच डॉ. वळसंगकर आणि मुसळे-माने यांच्यात वाद सुरू होते. माने हिने मेल लिहित आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. 9 / 9दरम्यान, डॉ. वळसंगकर यांनी संपत्तीची वाटणी काही महिन्या आधीच केल्याची माहिती समोर आली आहे. काही महिन्याआधीच त्यांनी मृत्यूपत्र तयार केले होते.