शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'पंढरीची वारी' - वारी बघायची नसते, वारी जगायची असते

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 1:33 PM

1 / 6
पंढरीच्या वारीमुळे वातावरण भक्तीमय झाले असून विठुरायाच्या भेटीची ओढ वारीकरी भक्तांना लागली आहे. पांडुरंगाच्या भेटीसाठी मार्गक्रमण करताना असा रंगला जातोय भक्ती-भावाचा खेळ. संगे फुगडी खेळू चला...
2 / 6
'मला विठोबाचा छंद, कपाळी केसरी गंध'.... असचं तर म्हणत नसतील ना हे वारीकरी. विठुनामाचा जप करत भक्तीत तल्लीन झालेली ही वारीकरी मंडळी, त्यांचा जोश नक्कीच वारीचे सामर्थ्य दर्शवते.
3 / 6
मजल दरमजल करत संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे पंढरपुराकडे प्रस्थान होत आहे. माऊलींच्या या गावभेटींवेळी माऊलींचे दर्शन घेण्यासाठी गावकरी गर्दी करतात, तर माऊलींच्या अश्वाचेपुढेही नतमस्तक होतात.
4 / 6
गाव म्हणू नका, शेत म्हणू नका, घर म्हणू नका, दार म्हणू नका. जागा मिळेल तेथे विठुरायाचे स्मरण करत भक्तीभावातून वारीतील वारकऱ्यांची ऊर्जा वाढविण्याचे काम हातात टाळ घेऊन ही मंडळी करत आहे.
5 / 6
रिंगण ही वारीची शोभा. माऊलींच्या पालखीचे रिंगण पाहण्यासाठी महाराष्ट्र आतुरलेला असतो. कुणी टेलिव्हिजनवर, कुणी प्रत्यक्ष, तर आता सोशल मीडियाच्या माध्यमातूनही वारीचे रिंगण पाहायची संधी सोडूच वाटत नाही.
6 / 6
कपाळी केशरी गंद आणि गळ्यात वीणा घेऊन विठुनामाचा गजर करताना साध्याभोळ्या या वारकऱ्यांमध्ये जोश कुठून येतो. कुठून येतो हा संचार, स्फुर्ती, उत्साह. भगवंत-भक्तीच्या या खेळात असते निस्वार्थ प्रेम आपल्या विठुरायाचे...