शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Pandharpur Election Results : निकालाने भाजपाचे 'समाधान' झाले, परिचारकांच्या वाड्यावर एकत्र जमले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2021 2:51 PM

1 / 10
राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात भाजपाच्या समाधान आवताडे यांनी सहाव्या फेरीनंतर शेवटपर्यंत आघाडी घेतली.
2 / 10
अद्याप दोन फेऱ्या बाकी आहेत, पण भाजपा समर्थकांनी विजयी जल्लोष सुरू केला आहे. राष्ट्रवादीसह भाजपानेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत चुरशीची लढत पाहायला मिळाली.
3 / 10
मात्र, एकदा पिछेहाट झाल्यानंतर भगिरथ भालके हे शेवटपर्यंत आवताडेंची आघाडी तोडूच शकले नाहीत. समाधान आवताडे यांना 35 व्या फेरीअखेर 4549 मतांची आघाडी होती. त्यानंतर, आवताडे यांच्या घराबाहेर भाजपा समर्थकांकडून विजयी जल्लोष करण्यात आला.
4 / 10
महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या या पोटनिवडणुकीच्या निकालातील महाविकास आघाडीचे उमेदवार भगिरथ भालके आणि भाजपाच्या समाधान आवताडेंमध्येच चुरशीची लढत झाली.
5 / 10
या मतदारसंघात एकूण 19 उमेदवार रिंगणात होते, पण इतर उमेदवारांना हजार मतंही घेणं अवघड बनलं होतं. समाधान आवताडे यांनी 19 व्या फेरीपर्यंत म्हणजे पढरपूर शहर आणि ग्रामीण भागातील मतमोजणी होईपर्यंत आपली आघाडी कायम ठेवली.
6 / 10
त्यानंतर, मंगळवेढा येथील मतमोजणीला सुरुवात होताच, त्यांच्या आघाडीच्या मतांमध्येही चांगली वाढ झाल्याचे सातत्याने दिसून आलं.
7 / 10
पंढरपूर विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या एकूण 38 फेऱ्या पार पडल्या. त्यामध्ये, सुरुवातीला पोस्टल मतमोजणी घेण्यात आली. त्यामध्ये भगिरथ भालकेंना आघाडी मिळाली होती.
8 / 10
पहिल्या 5 फेऱ्या होईपर्यंत भालकेंनी आघाडी कायम ठेवली. मात्र, त्यानंतर, आवताडेंनी आघाडी घेत शेवटपर्यंत मतांचा आलेख वाढतच नेला. अखेरच्या टप्प्यात ते भूमिपुत्र असलेल्या मंगळवेढा मतदारसंघातूनही त्यांना चांगलं मताधिक्य मिळालं
9 / 10
आपल्या विजयावर शिक्कामोर्तब झालं असं समजून कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला. तसेच, समाधान आवताडेंच्या घराबाहेरुन कार्यकर्ते थेट परिचारक यांच्या वाड्यावर पोहोचले.
10 / 10
भाजपा उमेदवार समाधान आवताडे आणि प्रशांत परिचारक यांनी वाड्यावर निवडणूक निकालानंतर गप्पा मारल्या. यावेळी, परिचारक यांच्याकडून आवताडेंचं अभिनंदनही करण्यात आलं.
टॅग्स :Pandharpur By Electionपंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक निकाल 2021PandharpurपंढरपूरSolapurसोलापूरBJPभाजपाBharat Bhalkeभारत भालके