शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पंढरीची वारी, भीमेच्या काठी फुले भक्तीचा मळा...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2019 5:18 PM

1 / 13
आषाढी एकदशीनिमित्त चंद्रभागेतीरी वैष्णवांचा मेळा जमला आहे, हा क्षण पाहून अभंगातील त्या ओवी आठवतात. भीमेच्या काठी फुले भक्तीचा मळा...
2 / 13
विठ्ठलभक्तीच्या ओढीने गेल्या महिनाभरापासून पायी चालत येणाऱ्या वारकऱ्यांचे पाऊल आज पंढरीत दाखल झाले. त्यानंतर चंद्रभागेत स्नान करुन विठु-माऊलीचे दर्शन या वारकऱ्यांनी घेतले
3 / 13
विठ्ठल भक्तीच्या उत्सवात दंग झालेले वारकरी, देहभान विसरून टाळ-मृदुंगाच्या गजरात दंग झाले पांडुरंगाच्या अभंगात
4 / 13
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक विठोबा रायाची पूजा केली, यावेळी बोलताना, गतवर्षी येऊ न शकल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली
5 / 13
मुख्यमंत्र्यांसमवेत पूजा करणयाचा बहुमान यंदा लातूर जिल्ह्यातील अहमदपूरच्या वारकरी दाम्पत्याला मिळाला
6 / 13
अहमदपूरचे चव्हाण दाम्पत्य गेली 40 वर्षांपासून अखंडपणे पंढरीची वारी करतात, यंदा हा सन्मान मिळाल्याने त्यांचा आनंद गगनात मावेना
7 / 13
डोक्यावर कळस घेऊन हातांनी टाळ्या वाजवून, मुखाने विठ्ठलाची गाणी गाऊन पंढरीकडे चाललेली माऊली....
8 / 13
ना पावसाची भीती, ना उन्हाचे चटक्याची चिंता, केवळ मनी पांडुरंगाच्या भक्तीचीच ओढ लागलीय. म्हणूनच पाऊले चालती पंढरीची वाट..
9 / 13
आषाढी एकादशीला वारकऱ्यांसाठी चंद्रभागेत पाणी सोडले जाते, या पाण्यात स्नान करूनच वारकरी विठ्ठलाचे दर्शन घेतात
10 / 13
विठु-माऊलीच्या पूजेवेळी रखुमाईला नैवैद्य दाखवता सौ. मुख्यमंत्री आणि मानाच्या वारकरी सौ. चव्हाणताई
11 / 13
पंढरपूरची वारी पूर्ण करत पंढरपुरात दाखल झाल्यानंतर बाजारात गर्दी केलेले वारकरी
12 / 13
मुख्यमंत्र्यांसह पुजेचा मान मिळाल्याने चव्हाण दाम्पत्य अतिशय आनंदी होते, तर यंदा वारकरी संप्रदायाकडून आपला होऊन करुन पूजा करण्याचा मान मिळाल्यानेही मुख्यमंत्रीही खुश होते
13 / 13
विठु-माऊलीचे दर्शन झाल्यानंतर पंढरीत पोहोचलेल्या पालख्या आज पुन्हा परतीच्या प्रवासाला निघणार आहेत.विठ्ठलाची क्षणीक भेटही वारकऱ्यांना वर्षभराची ऊर्जा देते
टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीPandharpurपंढरपूरPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळा