World Disability Day: Blind Painter's Eyesight, Veteran on Pimple Leaf
जागतिक अपंग दिन : अंध चित्रकाराची डोळस दृष्टी, पिंपळाच्या पानावर साकारल्या दिग्गज व्यक्ती By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2021 9:34 AM1 / 9कोरोना काळात अनेकांचे रोजगार गेले, लॉकडाऊन असल्याने सर्वकाही ठप्प झाले होते. मात्र, जिथं एक संपतं तिथं दुसरी सुरूवात होते असं म्हणतात ते एका दिव्यांग अलविलयाने खरं करुन दाखवलंय. 2 / 9सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील जामगावच्या चित्रकार महेश मस्केनेही असाच काही करिश्मा चित्रकारितेच्या क्षेत्रात केला. लॉकडाऊनमुळे चित्रकलेसाठीचे कागद आणि पेन्सिल रंग मिळणे बंद झाल्याने नवा प्रयोग केला. 3 / 9महेशनं चित्रकलेची आवड लहानपणापासूनच जोपसली असून पेन्सिल चित्रानंतर पिंपळाच्या पानावरील चित्र आणि आता वेगवेगळ्या पानावरील व्यक्ती चित्रांच्या रेखाटनातून स्वत:ची ओळख निर्माण केलीय. 4 / 9गावापासून ते तालुक्यातपर्यंत तसेच राज्यभरातील दिग्गज व्यक्तींची, राजकीय नेत्यांची आणि कलाकारांची चित्रे महेशन लॉकडाऊन काळात रेखाटली. 5 / 9विशेष म्हणजे महेशने केवळ ही चित्रे रेखाटली नसून ती चित्रे प्रत्यक्षपणे भेटून त्या व्यक्तींना भेटही दिली आहे. त्यामध्ये, बॉलिूवड अभिनेता आणि लॉकडाऊनचा मसीहा सोनू सूदचाही समावेश आहे. 6 / 9राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही बारामती येथे भेटून आपली कलाकृती भेट दिली. तर, राजभवन जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून या कलेचा मान सन्मान स्वीकारला. 7 / 9मध्यंतरीच्या काळात स्वतः, मुख्यमंत्र्यांनी देखील कौतुक करून महेशला शुभेच्छा दिल्या आहेत. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही फोन करुन महेशच्या कलाकृतीचे कौतुक केले. 8 / 9महेशने आजतागायत पिंपळाच्या पानावर दोनशे ते तीनशेपर्यंत अनेक व्यक्तीचित्र आणि कलाकृती साकारल्या आहेत. त्यापूर्वी महेशन पेन्सिलने कागदावर हुबेहुब अशी व्यक्तीचित्र साकारली आहेत. 9 / 9महेश मस्के हा चित्रकार एका डोळ्याने अंध आहे, मात्र महेशचा हा डोसळपणा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications