शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सावधान! Google वरील ‘या’ चुकांमुळे तुम्हाला होऊ शकतो तुरुंगवास

By सिद्धेश जाधव | Published: December 20, 2021 1:28 PM

1 / 11
रिलीज होण्याआधी ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर एखादा चित्रपट लीक करणं किंवा अनधिकृतरित्या असा चित्रपट डाउनलोड केल्यास कमीत कमी 3 वर्ष जेलमध्ये विना करमणूक काढावे लागतील. सोबत 10 लाख रुपयांचा दंड देखील द्यावा लागेल. यात चित्रपटगृहात जाऊन चित्रपट रेकॉर्ड करून त्याचा व्यवसायिक वापर करणाऱ्यांचा देखील समावेश आहे.
2 / 11
गर्भपात करण्याच्या पद्धती गुगलवर शोधल्यास जेलची हवा खावी लागू शकते. डॉक्टरच्या परवानगीविना गर्भपात करणे बेजयदेशीर आहे.
3 / 11
Google वर युजर्सना माहिती शोधण्याचं स्वातंत्र्य आहे. परंतु गुगल सिक्योरिटीची देखील तेवढीच काळजी घेते. कंपनीच्या पॉलिसीमधून याची माहिती मिळते. गुगल युजरच्या देशातील नियमांचे पालन करतो. त्यामुळे गुगलवर काही गोष्टी सर्च केल्यास त्यांची दखल घेऊन तुमच्यावर कारवाई केली जाऊ शकते.
4 / 11
Google किंवा इतर कोणत्याही डिजिटल प्लॅटफॉर्मवर परवानगीविना कोणाचेही खाजगी फोटो आणि व्हिडीओ शेयर करू नये. सायबर क्राईम कायद्या अंतर्गत यासाठी शिक्षा होऊ शकते.
5 / 11
चाईल्ड पॉर्न संबंधित भारतात कडक कायदे करण्यात आले आहेत. गुगलवर चाईल्ड पॉर्न सर्च करणाऱ्या आणि सोबत बाळगणाऱ्या व्यक्तीला तुरुंगवास होऊ शकतो. पास्को अ‍ॅक्ट 14 अंतगर्त चाईल्ड पॉर्न शेयर करणे आणि बनवणे गुन्हा आहे. यासाठी कमीत कमी 5 तर जास्तीत जास्त 7 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
6 / 11
छेडछाड किंवा गैरवर्तन झालेल्या पीडितेचं नाव आणि फोटो शेयर करणे बेकायदेशीर आहे. मग माध्यम कोणतंही असो. असं केल्यास तुरुंगाची हवा खावी लागू शकते.
7 / 11
Google कडे सर्व उत्तर मिळतील. परंतु चुकूनही बॉम्ब बनवण्याची पद्धत सर्च करू नका. अशा गोष्टी सर्च केल्यास तुमच्या डिवाइसचा आयपी अ‍ॅड्रेस सुरक्षा एजन्सीजकडे पाठवला जाऊ शकतो.
8 / 11
इंटरनेटवरील वेबसाईट्सकडे सर्व आजारांची माहिती आणि उपाय मिळतात. परंतु त्यांना तुमच्या आरोग्याची माहिती नसते. त्यामुळे लक्षण गुगल करून आजारांवर उपाय शोधू नका. त्यामुळे परिस्थिती चिघळू शकते. डॉक्टरांची मदत घ्या.
9 / 11
पैसे वाचावे म्हणून आपण फ्रि ऍप्लिकेशन्स शोधतो. परंतु असे ऍप्स मालवेयर इन्फेक्टड असू शकतात. जे तुमच्या डिवाइसची वाट लावू शकतात. त्यामुळे अधिकृत स्टोर किंवा कंपनीच्या वेबसाईटवरून ऍप्स इंस्टाल करणं नेहमीच सेफ असतं.
10 / 11
गुगल किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शॉपिंग ऑफर्स शोधणं महागात पडू शकतात. फसव्या वेबसाईट्सवर गुगल देखील नियंत्रण ठेऊ शकत नाही. अशा वेबसाईट पैसे घेऊन प्रोडक्ट नं पाठवणं आणि चुकीचे किंवा खराब प्रोडक्ट पाठवण्याचं काम देखील करतात.
11 / 11
Google वर कोणताही कस्टमर केयर नंबर सर्च करणं नुकसानदायक ठरू शकतं. अनेकदा खोट्या वेबसाईट, हेल्पलाइन नंबर आणि पत्ते देखील Google Search मध्ये दिसतात. गुगलवरून मिळालेल्या हेल्पलाईन नंबरवर कॉल केल्यामुळे फसवणुक झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.
टॅग्स :technologyतंत्रज्ञान