शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

₹ 107 मध्ये 3gb हायस्पीड इंटरनेट अन् 35 दिवसांची व्हॅलिडिटी; BSNL चा सर्वात स्वस्त प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 6:40 PM

1 / 6
BSNL Recharge Plan : देशातील खासगी टेलिकॉम कंपन्या Jio, Airtel आणि Vi ने आपल्या रिचार्जच्या किमती वाढवल्यामुळे अनेक ग्राहक BSNL वर स्विच करत आहेत. तुम्हीही BSNL सिम घेण्याचा विचार करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे. आम्ही तुम्हाला कंपनीच्या सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत. या प्लानची सर्वात खास गोष्ट म्हणजे, या प्लानची किंमत 110 रुपयांपेक्षा कमी आहे.
2 / 6
BSNL चा 107 रुपयांचा प्लॅन- BSNL च्या या 107 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकाला Jio, Airtel आणि Vodafone Idea (Vi) पेक्षाही चांगले फायदे मिळतात. यात युजरला 3 gb हाय स्पीड डेटा मिळतो. तसेच, लोकल आणि एसटीडी कॉलिंगसाठी 200 फ्री मिनिटेही दिली जातात. विशेष म्हणजे या प्लॅनची व्हॅलिडिटी 35 दिवसांची आहे. यात युजरला 35 दिवसांसाठी बीएसएनएल ट्यूनचा लाभही मिळतो.
3 / 6
Jio चा 189 रुपयांचा प्लॅन- जिओचा सर्वात स्वस्त डेटा आणि कॉलिंग प्लॅन 189 रुपयांचा आहे. यात तुम्हाला फक्त 2 GB हाय स्पीड डेटा मिळतो. तसेच, या प्लॅनची व्हॅलिडिटी फक्त 28 दिवसांची आहे.
4 / 6
Aritel चा 199 रुपयांचा प्लान- एअरटेलचा सर्वात स्वस्त प्लॅन 199 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला 2 GB हाय स्पीड डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि 28 दिवसांची वैधता देखील मिळते.
5 / 6
Vi चा 179 प्लॅन पर्याय- Vodafone Idea चा सर्वात स्वस्त प्लॅन 179 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये युजरला 1 GB हाय स्पीड डेटा आणि अमर्यादित कॉलिंग मिळते.
6 / 6
एकूणच काय, तर जिओ, व्ही आणि एअरटेलकडे असा कोणताही स्वस्त प्लॅन नाही, जो किंमत आणि वैधतेच्या बाबतीत 107 रुपयांच्या BSNL रिचार्ज प्लॅनला टक्कर देऊ शकतो.
टॅग्स :BSNLबीएसएनएलAirtelएअरटेलJioजिओVodafone Ideaव्होडाफोन आयडिया (व्ही)Smartphoneस्मार्टफोन