खूशखबर! WhatsApp चे 'हे' 5 नवीन दमदार फीचर्स पाहिलेत का?; ठरणार अत्यंत फायदेशीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2023 10:31 IST
1 / 6लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग ॲप WhatsApp लवकरच ५ नवीन फिचर्स आणण्याच्या तयारीत आहे. हे पाचही फिचर्स वापरकर्त्यांसाठी खूप उपयुक्त ठरणार आहेत.2 / 6ब्लॉक शॉर्टकट या फीचरच्या माध्यमातून नको असलेले कॉन्टॅक्ट ब्लॉक करणे पूर्वीपेक्षा सोपे होणार आहे.3 / 6तुम्ही चॅट हिस्ट्री एका डिव्हाइसवरून दुसऱ्या डिव्हाइसवर सहजपणे हलवू शकता. हे करण्यासाठी, वापरकर्त्यांना आता गुगल ड्राइव्ह वापरण्याची गरज पडणार नाही.4 / 6जेव्हा अँड्रॉइड वापरकर्ते एखाद्याला कॅप्शनसह फोटो किंवा व्हिडिओ पाठवतात तेव्हा त्यांना कॅप्शन वेगळे पाठवावे लागते. ही समस्यादेखील आता दूर होईल.5 / 6कोणत्या छायाचित्रामध्ये टेक्स्ट मेसेज किंवा अक्षरे लिहिलेली आहेत आणि कोणत्यावर नाही, हे WhatsApp च्या नवीन फीचरमध्ये ओळखता येणार आहे. हे नवीन फीचर बीटा व्हर्जनवर दिले जात आहे.6 / 6WhatsApp कॅमेरा आणखी चांगला बनवण्यासाठी काम करत आहे. सध्या वापरकर्त्यांना व्हिडीओ रेकॉर्ड करण्यासाठी कॅमेरा बटण दाबून ठेवावे लागते, परंतु नवीन फीचरमध्ये ही समस्याही दूर होईल आणि वापरकर्त्यांचे हात मोकळे राहतील.