फक्त YouTube नव्हे तर ‘हे’ 5 सोशल मीडिया अॅप्स देखील देत आहेत कमाईची संधी By सिद्धेश जाधव | Published: December 13, 2021 6:28 PM
1 / 8 Facebook देखील व्हिडीओ क्रिएटर्सना कमाईची संधी देत आहे. यासाठी युजर्स फेसबुक पेज करून या संधीचा फायदा घेऊ शकतात. तुम्ही पेजवर पोस्ट केलेल्या व्हिडीओजवर जाहिरात दाखवल्या जातात आणि त्या जाहिरातींची कमाई फेसबुक तुमच्यासोबत शेयर करतं. 2 / 8 Instagram वरून देखील सध्या चांगली कमाई केली जात आहे. जास्त फॉलोवर्स आणि व्युज असलेल्या इन्फ्ल्यूएंसर्स या प्लॅटफॉर्मचा वापर जाहिरातदार मिळवण्यासाठी करत आहेत. इंस्टाग्राम देखील अन्य अॅप्स प्रमाणे क्रिएटर्सना थेट पेमेंट देण्याच्या योजनेवर काम करत आहे, अशी बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. 3 / 8 काही दिवसांपूर्वी आलेल्या CNBC च्या रिपोर्टनुसार, Snapchat वर शेयर आणि क्रिएट केलेल्या केंटेटवरून रोज 1 मिलियन डॉलर्सची कमाई केली जात आहे. यासाठी Snapchat युजर्सना फक्त आपल्या स्मार्टफोन कॅमेऱ्याचा वापर करून कंटेंट शेयर करावा लागतो. 4 / 8 स्मार्टफोन कॅमेऱ्यातून क्रिएट केलेला कंटेंट किंवा स्नॅप (Snap) Spotlight वर सबमिट करून कमाई करता येते सर्वोत्कृष्ट Snap शेयर करणाऱ्या युजर्सना कंटेंटच्या बदल्यात पैसे मिळतात. 5 / 8 Youtube वरील कमाईची अगदी तुम्हाला माहिती असेलच. इथे फक्त युट्युबकडून मिळणाऱ्या पैशांवर अवलंबून न राहता क्रिएटर्स जाहिरातदार आणि मर्चन्डाईजचा वापर करून देखील अतिरिक्त कमाई मिळवू शकतात. 6 / 8 यासाठी चॅनेलवर कमीत कमी शेवटच्या 12 महिन्यात 1,000 स्बस्क्रायबर्स आणि 4,000 तास वॉच टाइम असणं आवश्यक आहे. यात अलीकडेच आलेल्या शॉर्ट व्हिडीओजची देखील मदत घेता येते. 7 / 8 फक्त व्हिडीओज मधून कमाई होत नाही नाही तर आपले विचार शब्दांत मांडणारे Twitter युजर देखील पैसे मिळवू शकतात. यासाठी कंपनीनं Tips Jar फिचर सादर केलं आहे. या फीचरच्या मदतीनं तुमचे फॉलोवर्स किंवा कोणीही युजर Tips पाठवू शकतात. हे फिचर सध्या अनेक कंटेंट क्रिएटर्स, पत्रकार, तज्ज्ञ आणि धर्मादाय संस्थांसाठी उपलब्ध आहे. 8 / 8 कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि अॅपमधून कमाई करण्यासाठी प्रत्येक प्लॅटफॉर्मचे नियम वेगवेगळे आहेत. ते सविस्तर जाणून घेणे आवश्यक आहे. तसेच कंटेंट क्रिएट करण्याच्या गाइडलाइंस देखील फॉलो करणे आवश्यक आहे. आणखी वाचा