5 tips for online dating that will keep you safe forever
ऑनलाईन डेटिंगच्या ‘या’ 5 टिप्स ठेवतील तुम्हाला कायम सुरक्षित By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 4:47 PM1 / 7“मी अगदी न चुकता एक काम करते ते म्हणजे त्या व्यक्तीने बायोमध्ये गमतीशीर वाक्यं किंवा पिकअप लाइनसोबतच जॉब प्रोफाइलसारख्या काही कायदेशीर गोष्टींचा उल्लेख केला आहे का, हे पाहते,” असं स्नेहांकिता मदिनेनी या हैदराबादमधील 23 वर्षीय तरुणीने सांगितलं. 2 / 7नवी दिल्लीतील 23 वर्षीय आर्यन भाटियाने एक प्रो-टिप सांगितली, “मी नेहमी मित्रमैत्रिणींसोबतचे फोटो आहेत का हे पाहतो. समोरची व्यक्ती खरी आहे, याची खात्री करण्याची माझी ही पद्धत आहे.” बायोबद्दल तो म्हणाला, “मी बायो लिहित होतो तेव्हा टिंडरच्या बायो गायडन्सची मदत झाली. माझ्या फोन नंबरसारख्या वैयक्तिक माहितीची तिथे गरज नव्हती. त्यामुळे अशी अनावश्यक माहिती लगेचच काढून टाकण्यात आली.” 3 / 7नवी दिल्लीतील 23 वर्षीय टिंडर सदस्य श्रेयस कोर्डे म्हणाला, “ज्या गोष्टीकडे सगळ्यात आधी आणि सगळ्यात जास्त लक्ष द्यायला हवं ती म्हणजे व्हेरिफाइड प्रोफाइल. समोरची व्यक्ती अनपेक्षित ट्रोल नाही यासाठीची ही एक उत्तम सुरक्षा चाचणी आहे.” “ब्लू टिक नसेल तर त्याचा अर्थ पुढे जायचंच नाही. टिंडरच्या सह तुम्हाला हे कळतं की प्रोफाइल पिक्चरमधील व्यक्तीच प्रत्यक्षात आहे,” असं कोलकात्यातील 20 वर्षीय टिंडर सदस्य सोहम दासगुप्ताने सांगितलं. 4 / 7“एखाद्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटण्याआधी मी टिंडरच्या फेस-टू-फेस फीचरमधून व्हिडीओ चॅट्स/डेट्स करण्याचा प्रयत्न करतो. आणि हे फक्त समोरची व्यक्ती दिसते कशी, हे पाहण्यासाठी करू नका. ही पद्धत सुरक्षित, सोपी आणि बऱ्याच अंशी परिपूर्ण वाटते,” असे श्रेयस म्हणाला.5 / 7“व्हिडीओ डेट्स ईझी-ब्रिझी असतात. यातून पुढे जाण्याची काही शक्यता आहे का हे (किंवा हिरवा झेंडा) लक्षात येतं. टिंडरच्या फेस-टू-फेस सुविधेत समोरच्या व्यक्तीनेही हे फिचर अनलॉक केले तर व्हिडीओ कॉल करता येतो. त्यामुळे, माझा मॅच असलेली समोरील व्यक्तीही यात वेळ देतेय म्हणजे तितकाच रस घेतेय, याची खात्री पटते,” असे सोहमचे मत आहे. 6 / 7श्रेयसच्या मते, “अनमॅच केल्यानंतरही एखाद्या व्यक्तीला रिपोर्ट करता येते ही टिंडरची आजवरची सर्वात चांगली सुरक्षा सुविधा आहे. आळशी, अश्लील किंवा अनादर करणारी व्यक्ती समोर आहे, असं आढळल्यास मी सहज अन-मॅच करू शकतो आणि रिपोर्टचा पर्याय वापरू शकतो. हे योग्य प्रकारे पुढे हाताळले जाईल, याची मला खात्री असते. तुम्ही फक्त टिंडर्स सेफ्टी टुलकिटमधील ‘रिपोर्ट’ पर्याय खुला करण्यासाठी त्या चॅट पेजवर असलेल्या बटणावर क्लिक करायचं.”7 / 7शेवटचा एक मुद्दा श्रेयसने मांडला, “माझ्या मॅचला आयआरएल म्हणजेच प्रत्यक्ष भेटण्यापूर्वी माझं सांगणं बहुतांश मी टाळतोच. काही अनपेक्षित प्रसंग घडलाच तर त्यासाठी मी मॅचचं प्रोफाइल माझ्या मित्राला नेहमीच शेअर करून ठेवतो.” आणखी वाचा Subscribe to Notifications