ब्लू टिकपासून प्रोफाईल फोटो लपवण्यापर्यंत; पाहा पाच Whatsapp ट्रिक्स By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2021 2:53 PM
1 / 10 Whatsapp वर सातत्यानं नवनवे फीचर्स येत असतात. सतत जरी आपण Whatsapp चा वापर करत असलो तरी ते कायमच आपल्या लक्षात राहतात असंही नाही. 2 / 10 Whatsapp असे अनेक फीचर्स आहेत ज्याबाबत आपल्याला अद्यापही माहित नाही. आज आम्ही तुम्हाला अशा काही ट्रिक्स सांगणार आहोत ज्या सोप्या तर आहेतच पण कदाचित तुमच्या कामीही येऊ शकतात. 3 / 10 ब्लू टिक ही मोठ्या कामाची गोष्ट आहे. याद्वारे तुमचा मेसेज समोरच्यानं वाचला की नाही याची माहिती मिळते. परंतु मेसेज पाहूनही रिप्लाय दिला नाही तर अनेकदा हीच बाब आपल्यासाठी त्रासदायकही ठरत असते. 4 / 10 यापासून वाचण्यासाठी ब्लू टिक बंद करणं कधीही चांगलं. यासाठी तुम्हाला Whatsapp च्या सेटिंग्समध्ये जावं लागेल. त्यानंतर अकाऊंटमध्ये जाऊन प्रायव्हसी या ऑप्शनमध्ये असलेल्या Read Receipts ला ऑफ केल्यानंतर तुमची ब्लू टिक बंद होईल. 5 / 10 Whatsapp अनेकदा आपण आपला प्रोफाईल फोटो ठेवत असतो. परंतु कोणत्याही अनोळखी व्यक्तीनं तो पाहावा असं कोणालाही वाटत नाही. यासाठी तो फोटो केवळ तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये असलेल्याच लोकांना दिसण्यासाठी यात एक फीचर देण्यात आलं आहे. 6 / 10 यासाठी Whatsapp च्या सेटिंग्समज्ये जाऊन अकाऊंट या ऑप्शनमध्ये जावं लागेल. त्यानंतर प्रायव्हसीचा ऑप्शन ओपन करून Profile Photo चा ऑप्शन दिसेल. यात Everyone, My Contacts, आणि Nobody हे ऑप्शन्स देण्यात आले आहेत. यातील माय कॉन्टॅक्ट हा ऑप्शन सिलेक्ट केला तर तुमच्या लिस्टमधील लोकांनाच तुमचा प्रोफाईल फोटो दिसेल. 7 / 10 अनेकदा आपल्याला ग्रुपमध्ये सर्वांना रिप्लाय द्यायचा नसतो. अशावेळी त्या व्यक्तीला रिप्लाय देण्यासाठी एक फीचर देण्यात आलं आहे. यासाठी तुम्हाला तो मेसज उघडून त्यावर लाँग प्रेस करावं लागेल, ज्याचा रिप्लाय तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर तीन डॉट्सवर क्लिक केल्य़ावर तुम्हाला रिप्लाय प्रायव्हेटली अशा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमचा मेसेज त्या व्यक्तीला वैयक्तिकरित्या जाईल. 8 / 10 जर तुम्हाला Whatsapp वर येणारे व्हिडीओ आणि फोटो डाऊनलोड करायचे नसतील तर यासाठीदेखील एक ऑप्शन देण्यात आला आहे. यासाठी Whatsapp च्या सेटिंग्समध्ये जाऊन Storage and Data मध्ये जावं लागेल. या ठिकाणी तुम्हाला Media Auto-Download हा पर्याय दिसेल. त्यानंतर तुम्ही मोबाईल डेटा आणि वायफाय या दोन्हीसाठी डाऊनलोडिंग बंद करू शकता. 9 / 10 Whatsapp वर कधी आपल्याला एखादा कॉन्टॅक्ट ब्लॉक करण्याची गरज भासते. असं केल्यास त्या व्यक्तीशी तुमचं Whatsapp वर संभाषण होणार नाही. ना एकमेकांची कोणतीही अपडेट दिसेल. 10 / 10 यासाठी तुम्हाला Whatsapp ओपन करून चॅटमध्ये जावं लागेल. त्यानंतर तुम्हाला ज्या व्यक्तीला ब्लॉक करायचं आहे त्याचं चॅट ओपन करावं लागेल. मेन्यूवर येऊन मोरमध्ये गेल्यावर तुम्हाला ब्लॉक हा ऑप्शन दिसेल. आणखी वाचा