शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Mobile चार्ज करताना अजिबात करू नका 'या' चुका; नाहीतर होईल मोठं नुकसान, वेळीच व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 3:31 PM

1 / 8
स्मार्टफोन हा जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. सध्या प्रत्येक जण मोठ्या प्रमाणात स्मार्टफोनचा वापर करीत आहे. दिवसभर फोनचा वापर केल्यानंतर याची बॅटरी लवकर संपते. त्यामुळे तुम्हाला वारंवार फोन चार्ज करावा लागतो. मात्र काही जण फोन चार्ज करताना अशा काही चुका करीत असतात की त्यामुळे फोनचं मोठं नुकसान होतं. तसेच चुकीच्या पद्धतीने चार्ज केल्याने फोनच्या बॅटरीवर देखील परिणाम होतो. कोणत्या चुका टाळाव्या हे जाणून घेऊया...
2 / 8
असे अनेक स्मार्टफोन युजर्स आहेत. ज्यांना आपला फोन हा 100 टक्क्यांपर्यंत चार्ज करायला आवडतं. पण बॅटरीसाठी नुकसानकारक ठरू शकते. अनेक युजर्संना चुकीची सवय लागलेली असते. अनेक युजर्स बॅटरी शून्यापर्यंत जात नाही तोपर्यंत आपला फोन सोडत नाहीत. परंतु, असे करणे चुकीचे आहे. तुमच्या फोनला 90 टक्क्यांपर्यंत चार्ज करा आणि जोपर्यंत बॅटरी 30 टक्क्यांपर्यंत येत नाही तोपर्यंत फोन चार्ज करू नका.
3 / 8
अनेक लोकांना वाटते की, फोन ओव्हरनाइट चार्ज करणे चांगले आहे. त्यामुळे रात्री झोपताना फोन चार्जिंगला लावून देतात आणि चार्जिंगवरून काढतात. फोनला रात्रभर चार्जिंगला लावणं अत्यंत चुकीचं आहे. रात्रभर फोन चार्जिंगला लावला असल्याने फोनची बॅटरी खराब होते. फोन सारखा चार्ज करू नका
4 / 8
फोनला चार्ज करताना अनेकजण फोनचा वापर करतात. परंतु हे देखील खूप चुकीचे आहे. फोनला चार्ज करताना फोनचा वापर करू नका. अनेकांना वाटते की, फोनचा वापर करता येईल आणि फोनची चार्जिंग सुद्धा होईल. परंतु असं करणं घातक ठरू शकतं.
5 / 8
फोनला चार्ज करताना तुम्ही जर फोनचा वापर करीत असाल तर फोनचा डिस्प्ले, प्रोसेसर, जीपीयू आणि अन्य अॅप्सचा वापर निरंतर होतो. असे केल्याने फोनच्या बॅटरीवर लाँग टर्म वाईट परिणाम होतो.
6 / 8
काही लोकांना वाटते की, फोन थोडा हिट होत असेल तर त्यात काही अडचण नाही. पण असा विचार करणं योग्य नाही. फोन चार्ज करताना किंवा गेमिंग किंवा नॉर्मल काम करताना फोन गरम होत असेल तर फोनची बॅटरी खराब होत असल्याचे हे लक्षण आहे. केवळ बॅटरी खराब होत नाही तर फुल होते कधी कधी फोनचा स्फोट सुद्धा होऊ शकतो.
7 / 8
फोनला चार्ज करताना फोन गरम होणार नाही. याची काळजी घ्या. थंड वातावरणात फोनला चार्ज करू नका. कारण, फोन बॅटरी कमी तापमानात आपली क्षमता गमावतो. तसेच जास्त गरम तापमानात सुद्धा फोनला चार्ज करू नका.
8 / 8
अनेक लोक असे आहेत जे आपल्या फोनला कोणत्याही फोनच्या चार्जरने चार्ज करतात. त्यांना त्यात काय चुकीचे आहे असं वाटतं. तुम्ही जर तुमच्या फोनला बनावट चार्जरने चार्ज करीत असाल तर तुमच्या फोनचं नुकसान होऊ शकतं. तसेच फोनची बॅटरी हळू हळू कमी होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान