शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

50MP कॅमेरा अन् फास्ट चार्जिंग सपोर्ट; Samsung ने लॉन्च केला सर्वात स्वस्त स्मार्टफोन...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2024 3:05 PM

1 / 6
Samsung Galaxy A06 Smartphone Launched in India: भारतात Samsung च्या स्मार्टफोन्सचे मार्केट खुप मोठे आहे. कंपनी अनेक महागडे फोन ऑफर करते. पण, आता कंपनीने भारतीय बाजारपेठेत एक स्वस्त स्मार्टफोन लॉन्च केला आहे. सामान्य वर्गाला डोळ्यासमोर ठेवून आणलेल्या या फोनचे नाव Samsung Galaxy A06, असे आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर हा फोन लिस्ट करण्यात आला असून, यात अनेक चांगले फिचर्स देण्यात आले आहेत.
2 / 6
किंमत-Samsung Galaxy A06 मध्ये 50MP कॅमेरा आणि 5000 mAh ची बॅटरी मिलते. या फोनचे दोन मॉडेल असून, बेसिक मॉडेल 9,999 रुपयांना मिळेल. यात 4GB+64GB स्टोरेज दिले आहे. याशिवाय, 4GB+ 128 GB व्हेरिएंटची किंमत 11,499 रुपये आहे. Samsung A Series चा हा फोन Samsung India e-store वर उपलब्ध आहे. लवकरच हा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर मिळेल.
3 / 6
Samsung Galaxy A06 चे स्पेसिफिकेशन्स-Samsung Galaxy A06 मध्य 6.7 इंच IPS LCD पॅनल दिले आहे, जे HD+ रेझोल्यूशनसह येते. यात 60 HZ चा रिफ्रेश रेट्स मिळतो. या फोनमध्ये कंपनीने MediaTek Helio G85 चिपसेट आणि Mali-G52 MP2 GPU चा वापर केला आहे. फोनचे स्टोरेज मेमरी कार्डद्वारे 1 टीबीपर्यंत वाढवता येते.
4 / 6
Samsung Galaxy A06 चा कॅमेरा सेटअप-Samsung Galaxy A06 मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप मिळतो. यात 50MP या प्रायमरी कॅमेरा आणि 2MP चा सेकंडरी कॅमेरा मिळेल. Samsung च्या या फोनमध्ये सेल्फीसाठी 8 MP चा कॅमेरा दिला आहे.
5 / 6
Samsung Galaxy A06 ची बॅटरी लाईफ-Samsung Galaxy A06 स्मार्टफोनमध्ये 5000 mAh ची बॅटरी दिली आहे, जी 25W फास्ट चार्जिंगच्या मदतीने चार्ज करता येते. यात Bluetooth v5.3 GPS आणि USB Type-C port मिळेल.
6 / 6
Samsung Galaxy A0 ची OS-या फोनमध्ये One UI 6.1 बेस्ड Andriod 14 ऑपरेटिंग सिस्टिम मिळेल. या हँडसेटमध्ये दोन ओएस अपडेट मिळतील आणि तीनवर्षांपर्यंत सिक्योरिटी अपडेट मिळेल. या फोनमध्ये साइड माउंडेट फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेस अनलॉक फिचर मिळेल.
टॅग्स :samsungसॅमसंगSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान