5g in india new report suggests 4 crore users can take up within first year of service rollout
भारतात 5G सेवांसाठी 50 टक्के अधिक खर्च करण्यासही तयार युझर्स; पहिल्याच वर्षी ४ कोटी ग्राहकांचा अंदाज By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 12:11 PM1 / 15सध्या देशात असलेल्या रिलायन्स जिओ, एअरटेल, व्होडाफोन-आयडियासारख्या कंपन्या 4G सेवा पुरवत आहेत. 2 / 15तर दुसरीकडे एमटीएनएल आणि बीएसएनसारख्या कंपन्या 3G सेवा पुरवत आहेत. 3 / 15सध्या भारतात अनेक युझर्स 5G सेवांची वाट पाहत आहेत. 4 / 15सध्या कोट्यवधी ग्राहक 5G सेवा घेण्यासाठी वाट पाहत असल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे. 5 / 15ज्यावेळी देशात 5G सेवा लाँच होईल तेव्हा पहिल्याच वर्षी किमान 4 कोटी ग्राहक त्याचा वापर करतील असा अंदाज एका अहवालातून व्यक्त करण्यात आला. 6 / 15Ericsson द्वारे करण्यात आलेल्या पाहणीतून हा अंदाज व्यक्त करण्यात आला. 7 / 15यामध्ये 5G आल्यानंतर सध्या किती स्मार्टफोन युझर्स आहेत आणि त्यांच्यावर काय परिणाम होतील याचा अभ्यास करण्यात आला. 8 / 15याशिवाय युझर्सना या तंत्रज्ञानाकडून काय अपेक्षा आहेत याची माहिती या सर्वेक्षणातून घेण्यात आली.9 / 15एरिक्सन इंडिया आणि नेटवर्क सोल्युशननं साऊथ ईस्ट इंडिया, ओशनिया अँड इंडियाचे प्रमुख नितीन बन्सल यांनी या अभ्यासातून अनेक महत्त्वाची माहिती समोर आल्याचं म्हटलं. 10 / 15काही भारतीय दूरसंचार कंपन्या 5G सपोर्टसाठी पहिल्यापासूनच काम करत आहेत. अशा परिस्थिती 5G सेवा लाँच केल्या तर पहिल्याच वर्षात किमान 4 कोटी ग्राहक यावर स्विच करतील असा अंदाज यातून व्यक्त करण्यात आला. 11 / 15भारतीय ग्राहक 5G सेवांसाठी 50 टक्के अधिक रक्कमही देण्यास तयार आहेत,तर 5G कनेक्टिव्हीटीसाठी ते 10 टक्के प्रिमिअमही देण्यास तयार असल्याचं अहवालातून समोर आलं आहे. 12 / 15एरिक्सनच्या अहवालानुसार 67 टक्के ग्राहकांनी आपलं नेटवर्क 5G मध्ये अपग्रेड करण्याची इच्छा व्यक्त केलं. तसंच दोन वर्षांपूर्वी 2019 मध्ये ही संख्या 14 टक्के होती.13 / 15भारतात सर्वाधिक युझर्सना 5G सेवा वापरण्याची इच्छा असल्याचं बन्सल म्हणाले. तसंच ज्यांना यात अपग्रेड करायचं आहे त्यांपैकी 70 टक्के ग्राहकांना 4G पेक्षा अधिक स्पीड हवा असल्याचं अहवालात म्हटलं आहे.14 / 15तर दुसरीकडे 60 टक्के फॅमिली मेम्बर्स अथवा काही डिव्हाईसेसद्वारे 5G डेटा शेअरिंगसारख्या सेवांचा लाभ घेऊ इच्छितात. 15 / 15ज्या ग्राहकांना 5G सेवांचा आनंद घ्यायचा आहे, त्यापैकी अनेकज व्हिडीओ आणि मल्टिप्लेअर मोबाईल गेमिंगमध्ये आपल्या घालवत असल्याचीही माहिती समोर आली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications