5g service is now available in all of these indian cities
'या' शहरांमध्ये दिसतोय 5G सिग्नल, तुमच्या फोनवर आलाय का? पाहा संपूर्ण लिस्ट... By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 10:50 AM1 / 6भारतातील अनेक शहरांमध्ये 5G नेटवर्क सुरू करण्यात आले आहे. एअरटेल (Airtel) आणि रिलायन्स जिओने ( Reliance Jio) भारतात 5G सेवा सुरू केली आहे. आता अनेक शहरांमध्ये Airtel आणि Jio ची 5G सेवा उपलब्ध आहे. सध्या जुन्या प्लॅनमध्येच 5G सेवेचा आनंद घेता येतो.2 / 6Jio ची 5G सेवा आता पूर्वीपेक्षा जास्त शहरांमध्ये सुरू झाली आहे. दोन्ही कंपन्यांनी सांगितले आहे की, आगामी काळात बहुतांश शहरे 5G नेटवर्कशी जोडली जातील. याद्वारे युजर्स 5G सेवेचा आनंद घेऊ शकतात.3 / 6Airtel ची 5G सेवा सध्या भारतातील 8 शहरांमध्ये उपलब्ध आहे. तर Jio ची 5G सेवा भारतातील 6 शहरांमध्ये सुरू करण्यात आली आहे. या वर्षाच्या अखेरीस ही सेवा बहुतांश शहरांमध्ये उपलब्ध होणार आहे. दरम्यान, आम्ही तुम्हाला अशा शहरांबद्दल सांगत आहोत, जिथे 5G सेवा उपलब्ध आहे.4 / 6Reliance Jio ची 5G सेवा सध्या दिल्ली, मुंबई, कोलकाता, वाराणसी, चेन्नई आणि नाथद्वारा येथे उपलब्ध आहे. नाथद्वारामध्ये Jio ची 5G सेवा मंदिरे, बस स्टँड, रेल्वे स्टेशन आणि इतर ठिकाणी वाय-फायद्वारे (Wi-Fi) दिली जाईल.5 / 6Airtel ची 5G सेवा सध्या दिल्ली, मुंबई, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद, सिलीगुडी, नागपूर आणि वाराणसी येथे दिली जाते. Airtel आणि Jio या दोन्हींकडून 5G सेवा दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि वाराणसी येथे उपलब्ध आहे.6 / 6दरम्यान, सध्या बहुतांश स्मार्टफोनवर 5G नेटवर्क उपलब्ध नाही. यासाठी स्मार्टफोन ब्रँडद्वारे एक OTA अपडेट जारी केला जाईल. या अपडेटनंतर फोनमध्ये 5G चा आनंद घेता येणार आहे. आता अनेक डिव्हाईसमध्ये 5G सपोर्ट आले आहे, त्यामुळे 5G सेवेचा आनंद त्या डिव्हाईसवर घेता येईल. आणखी वाचा Subscribe to Notifications