5g service will bring these benifits to indian users
5G सेवेबद्दल चांगली बातमी! युजर्सना मिळणार 'हे' 5 मोठे फायदे, जाणून घ्या... By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2022 4:07 PM1 / 6नवी दिल्ली : भारतात 5G सेवा सुरू करण्यात आली आहे. दूरसंचार कंपन्या 5G सेवा काही शहरांमध्ये सुरू करत आहेत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला 5G सेवा पूर्णपणे सुरू झाल्यानंतर युजर्सना कोणते फायदे मिळतील? याबद्दल सांगणार आहोत.2 / 6दरम्यान, 5G सेवा पूर्णपणे सर्वत्र सुरू होताच, तुम्हाला हाय स्पीड इंटरनेटचा अनुभव मिळू लागेल. 5G ही एक अशी सेवा आहे, ज्याची प्रत्येकजण वाट पाहत आहे, कारण हाय स्पीड इंटरनेट ही आज लोकांची गरज बनली आहे आणि 5G सेवा आल्यानंतर लोकांना हायस्पीड इंटरनेट वापरण्याचा अनुभव मिळेल.3 / 65G सेवेच्या आगमनानंतर, आता कॉलिंग पूर्वीपेक्षा चांगल्या क्वालिटीसह होईल आणि यादरम्यान कोणताही व्यत्यय येणार नाही. कारण बर्याच वेळा 4G नेटवर्कमध्ये कॉल करताना समस्या असायची, परंतु 5G सेवेमुळे अशी कोणतीही समस्या होणार नाही.4 / 65G सेवेद्वारे तुम्हाला हाय स्पीड इंटरनेट बघायला मिळेल, इतकेच नाही तर तुम्हाला एक चांगला डाउनलोडिंग स्पीड देखील मिळेल, जो या सेवेचा एक मोठा भाग आहे. 5G इंटरनेटमुळे युजर्स हेवी फाइल्स लवकर डाउनलोड करू शकतील.5 / 6कॉल ड्रॉपची समस्या 4G नेटवर्कमध्ये सामान्य आहे आणि अनेक वर्षांपासून युजर्सना याचा त्रास होत आहे. 5G नेटवर्क आल्यानंतर आता युजर्सची या समस्येपासून सुटका होणार आहे आणि कॉलिंग दरम्यान कोणतेही कारण नसताना अचानक कॉल कट होणार नाही, ज्यामुळे या सेवेचा मोठा फायदा होणार आहे.6 / 64G सेवेतील एक प्रमुख समस्या ही होती की, अनेक भागांमध्ये नेटवर्क पूर्णपणे गायब झाले होते आणि बर्याच भागात ते चांगले होते, परंतु 5G सेवा सुरू केल्यानंतर, तुम्हाला सर्वत्र नेटवर्कचे सर्वोत्तम कव्हरेज मिळेल, ज्यामुळे कॉलिंग करणे आणि इंटरनेटचा वापर अधिक सुलभ होईल. आणखी वाचा Subscribe to Notifications