शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

एकदाच चार्ज करून दिवसभर टिकणारा फोन हवा? मग 6000mAh बॅटरी असलेल्या हँडसेटमधून करा निवड

By सिद्धेश जाधव | Published: March 17, 2022 7:30 PM

1 / 6
Redmi 10 2022 आज भारतीयांच्या भेटीला आला आहे. Xiaomi नं हा फोन 6000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा, 8GB रॅम आणि Snapdragon 680 चिपसेटसह बजेट कॅटेगरीमध्ये सादर केला आहे. या फोनची किंमत 10,999 रुपयांपासून सुरु होते.
2 / 6
स्मार्टफोनमध्ये 6GB पर्यंत RAM सह 64GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. 6.82 इंचाचा डिस्प्ले असलेला हा फोन 48MP रियर कॅमेऱ्याला सप्रेत करतो. 9999 रुपयांमध्ये हा फोन 6000mAh ची बॅटरी देतो.
3 / 6
या फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी आणि Helio G88 प्रोसेसर मिळतो. सोबत 6GB पर्यंत RAM आणि 128GB पर्यंतची मेमरी मिळते. 6.5 इंचाचा डिस्प्ले असलेल्या या हँडसेटमध्ये 50MP रियर कॅमेरा आहे. या डिवाइसची किंमत 12999 रुपयांपासून सुरु होते.
4 / 6
या फोनची किंमत 14,499 रुपयांपासून सुरु होते. या मोटोरोला स्मार्टफोनमध्ये 6000mAh ची बॅटरी मिळते. Qualcomm Snapdragon 732G प्रोसेसरसह यात 6GB पर्यंत RAM आणि 128GB पर्यंतची मेमरी देण्यात आली आहे. सोबत 6.7 इंचाचा डिस्प्ले आणि 64MP चा कॅमेरा आहे.
5 / 6
सॅमसंगनं देखील 12,999 रुपयांच्या आरंभिक किंमतीत 6000mAh ची बॅटरी असलेला फोन सादर केला आहे. ज्यात 6.4 इंचाचा डिस्प्ले, 48MP कॅमेरा, MediaTek Helio G80 प्रोसेसर, 6GB पर्यंत RAM आणि 128GB पर्यंतची स्टोरेज मिळते.
6 / 6
रियलमीच्या या फोनमध्ये 6.52 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. Mediatek Helio G35 प्रोसेसरसह 4GB RAM आणि 64GB स्टोरेज देण्यात आली आहे. 6000mAh ची बॅटरी असलेला हा फोन 13MP क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. याची किंमत 9999 रुपयांपासून सुरु होते.
टॅग्स :Mobileमोबाइल