शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

WhatsApp आणि SMS वरील ७ मेसेजवर क्लिक करताच भानगडी वाढणार; मोठी फसवणूक होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 1:17 PM

1 / 7
'तुम्ही बक्षीस जिंकले आहे!' - हा आपल्या मोबाईलवर मेसेज काही बदलांसह येऊ शकतो, यात आपण जिंकलेल्या पुरस्काराची माहिती असते. पण तुम्हाला मिळालेला मेसेज घोटाळा असण्याची आणि तुमची माहिती चोरण्याची शक्यता असते. त्यामुळे या मेसेजला क्लिक करु नका.
2 / 7
तुम्हाला नोकऱ्यांच्या जाहीरात येतात. हा मोठा घोटाळा असू शकतो. नोकरीच्या ऑफर कधीही WhatsApp किंवा SMS वर येत नाहीत. या प्लॅटफॉर्मवर कोणतीही व्यावसायिक कंपनी कधीही तुमच्याशी संपर्क साधणार नाही, त्यामुळे हा एक निश्चित घोटाळा आहे. त्यामुळे या मेसेजवर क्लिक करु नका.
3 / 7
तुम्हाला मेसेजमध्ये url/लिंकद्वारे वापरकर्त्यांना KYC पूर्ण करण्यास सांगणारे SMS किंवा WhatsApp वर आलेले बँक अलर्ट मेसेज हे घोटाळे आहेत. यावर तुम्ही क्लिक केल्यास तुमच्या खात्यावरील रक्कम जाऊ शकते.
4 / 7
तुम्ही न केलेल्या खरेदीबद्दलची कोणतीही अपडेट हा घोटाळा आहे. असे मेसेज मिळाले तर क्लिक करु नका. तुमचा मोबाईल हॅक करुन तुमची माहिती चोरु शकतात.
5 / 7
ओटीटीची लोकप्रियता वाढत असताना, स्कॅमर स्मार्टफोन वापरकर्त्यांना नेटफ्लिक्स किंवा इतर ओटीटी सबस्क्रिप्शनच्या जाहीराती मेसेजिंगद्वारे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. याद्वारेही तुमची फसवणूक होऊ शकते.
6 / 7
तुम्हाला एखाद्या डिलिव्हरी किंवा मिस्ड डिलव्हरीचा मेसेज आला तर तीही फसवणूक असू शकते.
7 / 7
Amazon सुरक्षा सूचना, किंवा तुमच्या खात्यातील कोणत्याही सूचनांचे मेसेज येणे फसवणूक असू शकते. अॅमेझॉन किंवा कोणतीही ईकॉमर्स कंपनी अशा महत्त्वाच्या सूचनांसाठी तुमच्यापर्यंत एसएमएस किंवा व्हॉट्सअॅपवर कधीही मेसेज पाठवत नाहीत.
टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञानfraudधोकेबाजी