90 year old youtube gamer hamako mori gaming grandma guinness record sss
90 वर्षीय 'गेमर ग्रँडमा'ची गोष्टच न्यारी; गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड भारी By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 4:05 PM1 / 10आवड माणसाला काहीही करायला अनेकदा भाग पाडते. काहींना पुस्तक वाचायला आवडतं तर काहींनी ऑनलाईन गेम खेळायला आवडतात. प्रत्येक जण आपली आवड जपण्याचा प्रयत्न करत असतो. 2 / 10जपानमधील एका 90 वर्षांच्या आजींनी देखील हे खरं करुन दाखवलं आहे. वयाच्या 90 व्या वर्षी ऑनलाईन गेम खेळून आजींनी एक नवा विक्रम केला आहे.3 / 10हमाको मोरी असं या आजींचं नाव असून त्यांना व्हिडिओ गेमची प्रचंड आवड असल्याने 'गेमर ग्रँडमा' या नावानेही ओळखलं जातं. 4 / 10वयाच्या 39 व्या वर्षापासून त्यांनी गेम खेळायला सुरुवात केली आहे. 5 / 10हातात रिमोट कंट्रोल घेऊन गेम्स खेळण्यात आजी दिवसभर मग्न असतात. 6 / 10जगातील सर्वात वृद्ध युट्यूब गेमर असा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे.7 / 10'ग्रँड थेफ्ट ऑटो 5' हा या आजींचा सर्वात आवडता गेम आहे.8 / 102015 रोजी आजींनी एक युट्यूब चॅनल सुरू केलं. या चॅनलने जवळपास 2,50,000 सब्सक्रायबर्सचा टप्पा गाठला आहे.9 / 10एका महिन्यात त्यांनी 4 व्हिडीओ पोस्ट केले होते. गेमर आजींची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.10 / 10इतके वर्षे जगल्यानंतर मला असं वाटतंय की दीर्घ कालावधीसाठी गेम खेळण्याचा माझा निर्णय योग्य होता. मी खऱ्या अर्थाने माझ्या जीवनाचा आनंद घेतेय असं आजींनी म्हटलं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications