After fake Antutu scores Realme now caught using iPhone to demonstrate game streaming during launch
Realme चा पुन्हा झाला 'गेम'; Narzo 30A लाँचमध्ये आपलं समजून दाखवली iPhone ची गेमिंग फुटेज By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 7:24 PM1 / 15 Realme ही कंपनी नुकतीच आपल्या Antutu Score वरून वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. आता पुन्हा एकदा कंपनी चर्चेत आली आहे. 2 / 15परंतु यावेळी कंपनी आपल्या फोनमुळे नाही तर आपल्या लाँच इव्हेंटमुळे चर्चेत आली आहे. Realme नं नुकताच आपला स्मार्टफोन Realme Narzo 30A बांगलादेशमध्ये लाँच केला केला.3 / 15परंतु यावेळी कंपनीकडून मोठा गोंधळ झाला. कंपनीनं आपल्या Realme Narzo 30A च्या जागी गेम स्ट्रिमिंगमध्ये चक्क iPhone चंच गेम स्ट्रिमिंग दाखवलं.4 / 15कंपनीला आपल्या बांगलादेशातील लाँचदरम्यान Realme Narzo 30A द्वारे गेम स्ट्रिमिंग करायचं होतं. 5 / 15MySmartPrice च्या रिपोर्टनुसार ब्रँडनं आपल्या Realme Narzo 30A च्या जाही iPhone चा वापर केला होता. स्ट्रिमिंगदरम्यान Guided Access स्क्रिनवर पॉपअप होतं. 6 / 15जर तुम्ही PUBG हा गेम आयफोनवर खेळला असाल तर तुमच्या ते लक्षातही आलं असेल. 7 / 15परंतु Realme Narzo 30A च्या लाँचदरम्यान व्हिडीओमध्ये जेव्हा लाईव्ह स्ट्रिम होत होतं त्यावेळी हा Guided Access पॉप अप झाला. 8 / 15यामध्ये Guided Access Started, Triple Click the Side Button to Exit चा मेसेज मिळतो. 9 / 15 हे फीचर केवळ आयफोनसाठी देण्यात येतं. म्हणजेच हे फीचर Realme Narzo 30A मध्ये असणं अशक्य होतं. 10 / 15काही दिवसांपूर्वीच Realme Narzo 30A भारतात लाँच झाला असून त्याची किंमतीही कमी म्हणजेच 8,999 रूपये इतकी आहे. 11 / 15त्यामुळे यात आयफोन प्रमाणे गेमिंग एक्सपिरिअन्स मिळणं अशक्य असल्याचं काही जणांचं म्हणणं आहे. 12 / 15या प्रकरणी नंतर Realme कडून स्पष्टीकरण देण्यात आलं. कोरोनाच्या महासाथीमुळे नियमांकडे पाहता Realme Narzo 30A चा लाँच व्हिडीओ यापूर्वीच शूट करण्यात आला होता, असं कंपनीनं म्हटलं. 13 / 15या लाँच व्हिडीओमध्ये Realme Narzo 30A चा हँड्स ऑन गेमिंग व्हिडीओ होता. उत्तम क्वालिटीसाठी आम्ही गेमिग वाला भाग आमचे पार्टनर A1 Esports team नं रेकॉर्ड केला होता. त्यानंतर तो व्हिडीओ प्रोड्युसरना पाठवण्यात आल्याचं कंपनीनं म्हटलं.14 / 15स्मार्टफोनचा वापर पहिल्यांदा गेमिंग पार्टसाठी करण्यात आला होता. परंतु नजरचुकीनं दुसरी फाईल प्रोड्युसरना ट्रान्सफर झाली, जी नॉन रियलमी स्मार्टफोनची होती. यानंतर आम्ही त्वरित त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना याबाबत माहिती दिल्याचं कंपनीनं स्पष्ट केलं. 15 / 15रिप्रोडक्शननंतर आम्ही हा व्हिडीओ पुन्हा प्रदर्शित करू. यामुळे उद्भ्वलेल्या समस्येबाबत आम्ही क्षमस्व आहोत, असंही कंपनीनं म्हटलं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications