शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Airtel ने तयार केला 5G सेवांचा रोडमॅप; सुरूवातीला 'या' शहरांमध्ये सुरू होणार सेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2021 4:47 PM

1 / 10
लवकरच आता देशात 5G सेवांचीही सुरूवात होण्याची शक्यता आहे. देशाच 5G सेवांच्या बाबतमीत एअरटेलनं आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना मागे टाकलं आहे.
2 / 10
देशात सर्वप्रथम 5G सेवांची चाचणी करून Airtel नं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. आता कंपनीनं हे अत्याधुनिक तंत्रज्ञान लाँच करण्यासाठी एक रोडमॅपही तयार केला आहे.
3 / 10
देशात सर्वप्रथम 5G सेवांची सुरूवात मोठ्या शहरांपासून केली जाणार आहे. 5G सेवा या संपूर्ण देशात एकत्र लाँच केली जाणार नाही. यामध्ये मुंबई, दिल्ली, चेन्नई, हैदराबादसारख्या शहरांचा समावेश असू शकतो.
4 / 10
सरकारकडून परवानगी मिळाल्यांतर त्वरितच या सेवा लाँच केल्या जातील अशी माहिती टेलिकॉमटॉकनं एअरटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाल विट्टल यांच्या हवाल्यानं दिली.
5 / 10
एअरटेलचं मोबाईल ब्रॉडबँड इन्फ्रास्ट्रक्चर फ्युचर प्रुफ आहे. हे नवी 5G सेवा त्वरित सुरू करण्यासाठी तयार तंत्रज्ञान आहे. 5G सेवा देशात सुरू करण्यासाठी कंपनी तयार असल्याचंही एअरटेलनं सांगितलं.
6 / 10
कंपनीची 5G सेवा 4G च्या तुलनेत १० पट अधिक वेगवान असेल.
7 / 10
कंपनीनं या सेवेची हैदराबादमध्ये चाचणी केली आहे. तसंच मोठ्या जीबीची एक मुव्ही अवघ्या काही सेकंदांमध्ये डाऊनलोड करता येणार आहे.
8 / 10
Airtel ची 5G सेवा हैदराबादमध्ये कमर्शिअली लाँच करण्यात आली आहे. स्पेक्ट्रम मिळाल्यानंतर त्वरीत 5G सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती गोपाल विट्टल यांनी दिली.
9 / 10
5G सेवांमध्ये 3Gbps पर्यंत डाऊनलोड स्पीड मिळू शकतो. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार 5G सर्व्हिस स्पेक्ट्रम अलॉटमेंटनंतर त्वरित ही सेवा सुरू केली जाईल.
10 / 10
एअरटेलची ही 5G सेवा सर्व्हिस रेडिओ. कोअर आणि ट्रान्सपोर्ट डोमेनसाठी कंम्पॅटिबल असणार आहे. कंपनीनं 5G सेवांबाबतचा एक व्हिडीओदेखील युट्यूबवर शेअर केला आहे.
टॅग्स :technologyतंत्रज्ञानAirtelएअरटेलMobileमोबाइलdelhiदिल्लीIndiaभारतMumbaiमुंबईhyderabad-pcहैदराबादChennaiचेन्नई