airtel recharge plan removes amazon prime video mobile edition trial offer
Airtel चा धक्का! आता रिचार्जमध्ये 'ही' सुविधा मोफत मिळणार नाही, अनेक प्लान्समध्ये बंद By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 12:17 PM1 / 9Airtel Recharge Plan: टेलिकॉम कंपन्या अनेक ऑफर्सची भुरळ घालून ग्राहकांना आकर्षिक करत असतात. असेच एअरटेलनंही आपल्या ग्राहकांना Amazon Prime Video मोबाइल एडिशन ट्रायलची सुविधा सुरू केली होती. 2 / 9कंपनीनं आता बहुतांश रिचार्ज प्लानमधून Amazon Prime Video मोबाइल एडिशन ट्रायल प्लानला हटवलं आहे. 3 / 9कंपनीनं गेल्या वर्षीपासून Airtel Thanks ऑफरमध्ये प्राइम व्हिडिओचं ट्रायल देण्यास सुरुवात केली होती. एअरटेल कंपनी आपल्या ग्राहकांना Amazon Prime चं महिन्याभराचं सबस्क्रिब्शन ऑफर करत होती. 4 / 9एअरटेलच्या बऱ्याच रिचार्ज प्लानसोबत Amazon Prime उपलब्ध करुन दिलं जात होतं. ही सेवा आता बहुतांश रिचार्ज प्लानमधून बंद करण्यात आली आहे. 5 / 9Amazon Prime Video मोबाइल एडिशनच्या ट्रायलमध्ये युझर्सना स्मार्टफोनवर एक महिन्यासाठीचा मोफत अॅक्सेस मिळत होता. ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट आणि वेब सीरिज पाहणाऱ्यांसाठी एअरटेलची ही खूप जबरदस्त ऑफर होती. पण ती आता कंपनीनं बंद केली आहे. 6 / 9टेलिकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार एअरटेलच्या पोर्टफोलियोमध्ये आता फक्त दोन रिचार्ज आहेत की जे Amazon Prime चं मोबाइल सबस्क्रिब्शन ऑफर करतात. कंपनीच्या १०८ रुपये आणि ३५९ रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्येच ही सुविधा उपलब्ध आहे. 7 / 9३५९ रुपयांचा प्लान सामान्य व्हाउचर रिचार्ज प्लान आहे. तर १०८ रुपयांच्या रिचार्जमध्ये ग्राहकांना 4G डेटा ओन्ली प्लान दिला जातो. दरम्यान, एअरटेलनं याबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. पण समोर आलेल्या माहितीनुसार ३५९ रुपयांच्या रिचार्जमध्ये युझर्सना २८ दिवसांसाठी प्राइम व्हिडिओचं सबस्क्रिब्शन तर १०८ रुपयांच्या रिचार्जमध्ये ३० दिवसांसाठी सबस्क्रिब्शन मिळेल. पण यात कॉलिंग सुविधा नाही. केवळ 4G डेटा सुविधा उपलब्ध होईल. 8 / 9एअरटेल थँक्सच्या माध्यमातून ग्राहकांना एअरटेल प्रिमीयम, Apollo 24/7, विंक म्युझिक, FASTag वर १०० रुपये कॅशबॅक आणि फ्री हेलो ट्यूनचा लाभ मिळवता येतो. 9 / 9१०८ रुपयांच्या रिचार्जमध्ये ग्राहकाला 6GB डेटा मिळतो. पण हा एक डेटा बूस्टर रिचार्ज असल्यानं यात युझरला SMS किंवा कॉलिंगचा लाभ मिळत नाही. याची वॅलिडिटी देखील युझरच्या बेस प्लान इतकीच असते. आणखी वाचा Subscribe to Notifications