Alan Musk's starlink: एलन मस्क यांची कंपनी भारतीयांना ठकवतेय; स्टारलिंकवर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 22:09 IST
1 / 10देशातील इंटरनेट सेवेचा चेहरामोहरा लवकरच बदलणार आहे. स्टारलिंक डिसेंबर २०२२ पर्यंत देशात २ लाख ऍक्टिव्ह टर्मिनल्ससोबत सॅटेलाईट कम्युनिकेशन (सॅटकॉम) सेवा सुरू करणार आहे. यासाठी कंपनी सरकारच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. पण त्या आधीच स्टारलिंकवर भारतीयांना फसवत असल्याचे आरोप लागले आहेत. 2 / 10भारतात व्य़वसाय सुरु करण्याची घोषणा स्टारलिंकने गुरुवारी केली होती. परंतू त्याच्या दुसऱ्याच दिवशी एक मोठी एनजीओ डॉटकडे गेल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यामध्ये आरबीआयचादेखील उल्लेख करण्यात आला आहे. 3 / 10एलन मस्क यांची कंपनी स्टारलिंक इंटरनेट सर्विसेज (Starlink Internet Services) सॅटेलाईटद्वारे देते. कंपनी यासाठी ग्राहकांना रिफंडेबल अमाऊंट जमाकरून घेत डिव्हाईस देते. भारतात कंपनी पुढील वर्षी आपली सेवा देणार आहे. परंतू आतापासूनच कंपनीने बुकिंग सुरु केले आहे. 4 / 10ग्राहकांच्या हितासाठी काम करणाऱी एनजीओ टेलीकॉम वॉचडॉग (Telecom Watchdog) याच मुद्द्यावर स्टारलिंकला घेरले आहे. दूरसंचार विभागाकडे तक्रार केली आहे. एनजीओचा आरोप आहे की, स्टारलिंकला भारतात अद्याप लायसन मिळालेले नाही, तरी देखील एलन मस्क यांची कंपनी भारतीयांकडून 99 डॉलर म्हणजेच 7500 रुपये घेत आहे. हे भारतीयांना फसविल्यासारखे असून आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन आहे. 5 / 10एलन मस्क यांनी 2015 मध्ये स्टारलिंकची सुरुवात केली होती. तेव्हा त्यांनी म्हटले होते की स्टारलिंकचा उद्देश जगातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये इंटरनेट पोहोचविणे आहे. 6 / 10सध्या जे आपण इंटरनेट वापरतो ते समुद्राच्या खाली टाकलेल्या फायबर ऑप्टिक केबलद्वारे मिळते. ते याच केबलद्वारे जगातील दुसऱ्या देशात माहिती पुरविते. यासाठी कष्टही खूप लागतात आणि पैसाही अमाप लागतो. या केबल तुटल्यातर त्या शोधून दुरुस्त करणे देखील खूप कठीण काम असते. 7 / 10एलन मस्क यांची कंपनी हे इंटरनेट वापरायचे सोडून नवीन तंत्रज्ञानावर काम करत आहे. स्टारलिंकला लो ऑर्बिट सॅटेलाईटची मदत मिळते. कंपनीने आतापर्यंत दोन हजार सॅटेलाईट लाँच केले आहेत. हे सॅटेलाईट सुटकेसच्या आकाराचे आहेत. भविष्यात स्टारलिंक 42 हजार सॅटेलाईट अंतराळात पाठविणार आहे. 8 / 10स्टारलिंक आणि वाद यांचे सुरुवातीपासूनच नाते आहे. हे छोटे सॅटेलाईट खगोलशास्त्रज्ञांसाठी मोठे संकट निर्माण करत आहेत. रात्रीच्या वेळी हे सॅटेलाईट चमकत असल्याने ते शास्त्रज्ञांसाठी अडचण ठरत आहेत. 9 / 10या वादामुळे स्टारलिंकने चमकने कमी करण्यासाठी या सॅटेलाईटवर कोटिंग करण्यास सुरुवात केली आहे. परंतू त्यामुळे काही खास असा परिणाम झालेला नाहीय. 10 / 10संजय भार्गव यांनी बुधवारीच स्टारलिंक इंडियाचे प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारली. स्टारलिंक अनेक देशांमध्ये कार्यरत आहे. भारतात आम्हाला जास्तीत जास्त प्री-ऑर्डर मिळाल्यास सरकारी मंजुरी मिळवणं सोपं जाईल, असं भार्गव यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.