शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अलर्ट! तुमच्या मोबाईलवर येणारा OTP देखील सुरक्षित नाही; डेटा चोरीसाठी हॅकर्सचा नवा फंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 6:16 PM

1 / 8
सायबर सुरक्षा एक्स्पर्ट्सनं आता सायबर हल्ल्याच्या नव्या मार्गाचा शोध लावला आहे. हॅकर्स आता मोबाइल मेसेजच्या माध्यमातून तुमची वैयक्तीक माहिती चोरी करू लागले आहेत.
2 / 8
तुमच्या नेटबँकिंगच्या व्यवहारासाठी मोबाइलवर OTP (One Time Password) एसएमएसच्या स्वरुपात पाठवला जातो. या ओटीपी शिवाय तुमचा व्यवहार पूर्ण होऊ शकत नाही. पण आता हॅकर्स तुम्हाला येणारा OTP देखील हॅक करु लागले आहेत.
3 / 8
मोबाइल धारकाची वैयक्तीक माहिती चोरण्यासाठी OPT पाठविणाऱ्या SMS प्रणालीलाच हॅक करण्याचा फंडा हॅकर्सनं शोधून काढल्याचं सायबर तज्ज्ञांनी सांगितलं आहे.
4 / 8
टेलिकॉम इंडस्ट्रीमधील बेजबाबदारपणा एसएमएस सुविधा हॅक करण्याला जबाबदार असल्याचं मानलं जात आहे. कारण सुविधेतील कच्चे दुवे शोधून काढण्यात हॅकर्सला यश येतं म्हणजे टेलिकॉमकडून दिली जाणारी सुविधा पूर्णपणे सुरक्षित नाही हे सिद्ध होतं.
5 / 8
हॅकर्स तुमच्या मोबाइलमध्ये येणारे SMS रिडायरेक्ट करण्यासाठी सुरक्षा प्रणालीतील कच्च्या दुव्यांचा शोध घेतात. यात अनेक तांत्रिक गोष्टींचा समावेश आहे.
6 / 8
SMS सेवा हॅक करता येत असल्याचं मदरबोर्डचे रिपोर्टर जोसेफ कॉक्स यांनी उघडकीस आणलं आहे. त्यांनी एका हॅकरला आपला मोबाइल क्रमांक हॅक करुन त्यावर हल्ला करण्यासाठी अनुमती दिली होती.
7 / 8
माझ्या मोबाइलवर येणारा SMS संबंधित हॅकरच्या मोबाइलवर रिडायरेक्ट होण्यास यश आलं आणि हॅकरला मी मागवलेला OTP त्या मोबाइलवर देखील मिळाला, असं जोसेफ कॉक्स यांनी सांगितलं.
8 / 8
हॅकर्स अशापद्धतीनं हल्ला करतात की सायबर हल्ल्याचा पीडित ठरलेल्या देखील हल्ला झाल्याचा मागमूस देखील लागत नाही. त्याच्या मोबाइल येणारे मेसेज परस्पर हॅकरच्या मोबाइलवर जातात, असं जोसेफ कॉक्स म्हणाले.
टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमsmsएसएमएसInternetइंटरनेट