Amazingly Interesting YouTube Facts You Should Know
YouTube बद्दलच्या 'या' रंजक गोष्टी माहीत आहेत का? By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 2:51 PM1 / 9YouTube वर अनेक जण आपल्याला हवे असलेले व्हिडीओ पाहत असतात. युट्यूबबद्दलच्या काही रंजक गोष्टी जाणून घेऊया.2 / 9चाड हर्ले, स्टीव चेन आणि जावेद करीम या तिघांनी मिळून 14 फेब्रुवारी 2005 मध्ये युट्यूबची निर्मिती केली.3 / 9गुगल नंतर युट्यूब जगातील दुसऱ्या नंबरचं सर्वात मोठं सर्च इंजिन आहे. 4 / 9सुरुवातीला युट्यूबचं नाव Universal Tube,Rollforms ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर Utubeonline ठेवण्यात आलं. तर शेवटी Youtube असं ठेवलं.5 / 9युट्यूबवर मिनिटाला अनेक व्हिडीओ अपलोड केले जातात. जगभरात दर मिनिटाला 100 तासांपेक्षा जास्त कालावधीचे व्हिडीओ अपलोड करण्यात येतात. 6 / 9युट्यूबवर सर्वात पहिला व्हिडीओ 23 एप्रिल 2005 मध्ये अपलोड करण्यात आला होता. Me at the zoo असं त्याचं नाव असून त्यामध्ये युट्यूबचे सहसंस्थापक जावेद करीम देखील होते. 7 / 9युट्यूबवर Despacito हा व्हिडीओ सर्वात जास्त पाहिला गेला असून त्याला 6.1 बिलियन व्ह्यूज आहेत. 8 / 9अनेक देशांमध्ये युट्यूबला बंदी आहे. चीन, इराण आणि उत्तर कोरियामध्ये युट्यूब बॅन आहे9 / 9टी सीरीज (T-series) हे जगातील नंबर वन युट्यूब चॅनल आहे. टी सीरीजचे जवळपास 97 मिलियन सब्सक्रायबर आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications