american car company tesla has entered in indian market know 10 big things about that
Tesla ची भारतात एन्ट्री; जाणून घ्या कंपनीबद्दल १० महत्त्वाच्या गोष्टी By जयदीप दाभोळकर | Published: January 13, 2021 6:30 PM1 / 11अवघ्या काही दिवसांसाठी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनलेले आणि दुसऱ्या क्रमांकावर आलेले दिग्गज उद्योजक एलन मस्क यांच्या इलेक्ट्रीक कार आता भारतीय रस्त्यांवर धावणार आहेत. इलेक्ट्रीक वाहनांसाठी प्रयत्नशील असलेल्या केंद्र सरकारच्या योजनेला मोठा बूस्ट मिळाला आहे. टेस्ला बंगळुरुमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट युनिटद्वारे काम सुरु करणार आहे. जाणून घेऊया टेस्ला बद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी.2 / 11इंजिनिअर्सच्या एका समुहाकडून २००३ मध्ये टस्ला या कंपनीची स्थापना करण्यात आली होती. इलेक्ट्रिक गाड्या चालवताना कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाऊ नये असा ही कंपनी स्थापन करण्यामागील त्यांचा उद्देश होता. 3 / 11या कंपनीनं अवध्या काही काळातच म्हणजेच वर्षभरात इलेक्ट्रिक कार्स या अन्य कार्सप्रमाणेच वेगानं पळणाऱ्या आणि कम्फर्ट देणाऱ्या असल्याचं सिद्ध केलं. 4 / 11२००८ मध्ये टेस्लानं रोडस्टर. एका अत्याधुनिक बॅटरी तंत्रज्ञानाचा आणि इलेक्ट्रिक पॉवरट्रेनचा शुभारंभ केला. 5 / 11टेस्लानंतर आपली पहिली प्रिमिअम ऑल इलेक्ट्रिक सेडान गाडी डिझाईन केली. ही कार टेस्लाची सर्वोत्तम कारही ठरली. 6 / 11२०१० मध्ये टेस्लानं अमेरिकेत आपला आयपीओ लाँच केला. १९५६ मध्ये फोर्ड मोटर कंपनीच्या आयपीओनंतरची ही दुसरी अमेरिकन कंपनी ठरली.7 / 11२०१६ मध्ये टेस्लानं कमी किंमतीत अत्याधुनिक तंत्रज्ञानानं सज्ज अशा ३ गाड्या लाँच केल्या. आता टेस्ला ही कंपनी भारतातदेखील आपल्या ३ कार्स लाँच करण्याच्या तयारीत आहे. यांची किंमत ५५ ते ६० लाखांच्या दरम्यान असेल.8 / 11टेस्लाच्या कार्सचं उत्पादन कॅलिफोर्निआ आणि शांघायमध्ये केलं जातं. कंपनी आता भारतासहित विकसनशील देशांमध्येही विस्तार करण्याच्या तयारीत आहे.9 / 11भारत आणि अन्य देशांकडे पाहते टेस्ला कमी किंमतीतही कार्स बाजारात आणण्य़ाच्या तयारीत आहे. याची किंमत १८.३ लाखांपर्यंत असू शकते.10 / 11ऑक्टोबर २०२० मध्ये टेस्लाला ८.८ दशलक्ष डॉलर्सचा विक्रमी नफाही झाला होता.11 / 11१० जानेवारी २०२० रोजी बीएमडब्ल्यू, डॅमलर आणि फोक्सवॅगन यांना मागे टाकत टेस्ला अमेरिकेतील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी ठरली. आणखी वाचा Subscribe to Notifications