'अॅपल डे सेल': आयफोन घ्यायचा विचार करताय? नुसता विचार करु नका, सुरू झालाय मोठा सेल
By मोरेश्वर येरम | Updated: December 31, 2020 14:24 IST
1 / 7२०२० या वर्षाचा शेवट गोड करत 'आयफोन' खरेदी करण्याची उत्तम संधी आहे. कारण ३१ डिसेंबर २०२० ते ३ जानेवारी २०२१ पर्यंत 'अॅपल डे सेल'ची घोषणा करण्यात आली आहे. यात अॅपलच्या विविध उपकरांवर मोठी सूट देण्यात आली आहे. 2 / 7आयफोन-१२ वर मोठी सूट जाहीर करण्यात आली आहे. अॅपलचा आतापर्यंतचा सर्वात लेटेस्ट फोन असलेला 'आयफोन-१२' आता ७१, ४९० रुपयांमध्ये खरेदी करता येऊ शकेल.3 / 7Apple Day सेलमध्ये आयफोन-११ तुम्हाला ४६,९९९ रुपयांना खरेदी करता येऊ शकेल. 4 / 7विजय सेल्सकडून सुरू करण्यात आलेल्या या सेलमध्ये iPhone 12 Pro Max तुम्हाला १,१९,९०० रुपयांना विकत घेता येईल. तर iPhone 12 Mini आता ६० हजार ९०० रुपयांना उपलब्ध करुन देण्यात आला आहे. iPhone SE 2020 फोन या सेलमध्ये ३२,९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. 5 / 7Apple Watch Series 6 बाबत बोलायचं झालं तर त्यावरही मोठी सूट देण्यात आली आहे. Apple Watch Series 6 मधील स्मार्ट घड्याळांची किंमत ३५,९९० रुपयांपासून सुरू होत आहे. 6 / 7Apple Watch SE तुम्हाला या सेलमध्ये २६,४९० रुपयांना खरेदी करता येईल. Apple Airpods ची किंमत १२,३९९ रुपये इतकी आहे. तर Apple AirpodPro तुम्हाला २०,४९० रुपयांना खरेदी करता येईल. 7 / 7Apple Day सेलमध्ये मॅकबुकवरही सूट आहे. MacBook Air तुम्हाला ५९,९९० रुपयांना खरेदी करता येईल. तर अॅपलचे स्मार्ट स्पिकर HomePods फक्त १४,९९० रुपयांना खरेदी करता येतील.