पटापट संपतोय Apple च्या फोन्सचा स्टॉक! Amazon देतंय iPhone 11, 12 आणि 13 वर जबरदस्त सूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 18:49 IST
1 / 6Apple येत्या 8 मार्चला आपला सर्वात स्वस्त 5G iPhone सादर करू शकते. परंतु त्याआधी iPhone 13, iPhone 12 आणि iPhone 11 सारख्या लोकप्रिय स्मार्टफोन्सवर डिस्काउंट दिला जात आहे. कंपनीच्या अधिकृत साईटवर जरी डिस्काउंट दिला जात नसला तर Amazon वर हे मॉडेल्स स्वस्तात उपलब्ध आहेत. 2 / 6iPhone 11 चा 64GB मॉडेल अॅमेझॉनवर 49,900 रुपयांमध्ये विकला जात आहे. तसेच ICICI, SBI आणि Kotak बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर केल्यास 4,000 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे.3 / 6त्यामुळे iPhone 11 डिस्काउंटनंतर 45,900 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच या फोनवर 14,900 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर आहे. ही सवलत तुमची एक्सचेंज करत असलेल्या फोनच्या कंडीशनवर अवलंबुन आहे 4 / 6iPhone 12 चा 64GB मेमरी व्हेरिएंट कंपनीच्या वेबसाईटवर 65,900 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. परंतु Amazon वर हा फोन 53,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. 5 / 6iPhone 12 च्या वेगवेगळ्या कलर व्हेरिएंटची किंमत वेगवेगळी आहे. परंतु या फोनच्या खरेदीवर 14,900 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. 6 / 6iPhone 13 स्मार्टफोन देखील Amazon वर 11,000 रुपयांपर्यंतच्या डिस्काउंटसह विकला जात आहे. तसेच SBI, ICICI आणि Kotak बँकेच्या कार्ड्सवर 6000 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट दिला जात आहे.